२ इतिहास 6:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “आता हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक माझे पिता दावीदाला आपण जे वचन दिले होते ते पाळावे. आपण म्हटले होते, ‘जसा तू होतास तसेच तुझे वंशज माझ्यासमोर माझ्या नियमानुसार चालण्यास सावधान राहतील, तर इस्राएलच्या राजासनावर बसण्यास तुझे वारस कधीही कमी पडणार नाही.’ See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तर आता हे इस्राएलाच्या देवा, परमेश्वरा, तुझा सेवक माझा बाप दावीद ह्याला तू असे वचन दिले होतेस की, ‘तू माझ्यासमोर वागत आलास त्याचप्रमाणे तुझे वंशज आपली चालचलणूक ठेवण्याची काळजी बाळगून माझ्या नियमांनुसार चालतील तर माझ्यासमक्ष इस्राएलाच्या राजासनावर बसणार्या तुझ्या कुळातल्या पुरुषांची परंपरा कधीही खुंटणार नाही.’ त्याला दिलेले हे वचनही तू पुरे कर. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तसेच आता, हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, दावीद या सेवकाला दिलेले हे वचनही खरे कर. तू असे म्हणाला होतास: माझ्यासमक्ष इस्राएलच्या राजासनावर न चुकता तुझ्या वंशातीलच कोणीतरी येत जाईल. मात्र तुझ्या मुलांनी माझ्या नियमशास्त्राप्रमाणे काटेकोर वर्तन केले पाहिजे. तुझ्याप्रमाणेच त्यांनीही माझा करार पाळला पाहिजे. See the chapter |