२ इतिहास 31:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 याजक, जे अहरोनाचे वंशज होते ते त्यांच्या गावांच्या आसपासच्या शेतजमिनीवर किंवा इतर कोणत्याही नगरांमध्ये राहत होते, त्यांच्यातील प्रत्येक पुरुषाला आणि लेव्यांच्या वंशावळीमध्ये ज्यांची नोंद झाली होती, त्या सर्वांना भागांचे वाटप करण्यासाठी नावानुसार पुरुष नेमले गेले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्याप्रमाणे जे अहरोन वंशातले याजक त्यांच्या प्रत्येक नगरात व शिवारात राहत असत त्या सर्व याजक पुरुषांना आणि लेव्यांपैकी ज्यांची वंशावळीत नोंद झाली होती त्यांनाही वाटणी देण्यासाठी माणसे नेमली होती. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 अहरोन वंशातील काही याजकांची लेवी राहत असत त्या गावांमध्ये शेत-शिवारे होती. काही अहरोनाचे वंशज नगरांमध्येही राहत होते. तेव्हा त्या नगरातील मनुष्यांची नावानिशी निवड करून त्यांना आपल्या उत्पन्नातला वाटा या अहरोन वंशजांना द्यायला निवडले होते. वंशावळीत नोंदवलेले सर्वजण आणि पुरुष लेवी यांना हा वाटा मिळे. See the chapter |