Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 23:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तिने बघितले राजा प्रवेशद्वाराच्या खांबाजवळ उभा आहे. अधिकारी आणि कर्णेवादक हे राजाजवळ उभे होते आणि राष्ट्रातील सर्व लोक हर्षोल्हास करीत कर्णे वाजवित आणि वादक त्यांच्या वाद्यांसह स्तुती करीत होते. तेव्हा अथल्याहने आपली वस्त्रे फाडली आणि ओरडून म्हणाली, “फितुरी, फितुरी!”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आणि पाहते तर राजा प्रवेशस्थानी आपल्या नेहमीच्या स्तंभाजवळ उभा आहे, सेनानायक व कर्णे वाजवणारे राजाजवळ आहेत; देशाचे सर्व लोक कर्णे वाजवून आनंद करीत आहेत; गाणारे व स्तवन शिकवणारे वाद्ये वाजवत आहेत; हे अथल्येच्या दृष्टीस पडले, तेव्हा ती आपली वस्त्रे फाडून, “फितुरी रे फितुरी!” असे म्हणाली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 पाहते तो तिला राजा दिसला. प्रवेशद्वाराशी तो राजस्तंभाजवळ उभा होता. कर्णे वाजवणारे कारभारी आणि लोक राजाजवळ उभे होते. देशभरचे लोक कर्णे वाजवून आनंद व्यक्त करत होते. गाणारे वाद्ये वाजवत होते आणि त्यांनी म्हटलेल्या स्तवनगीतापाठोपाठ लोक गात होते. तेव्हा आपली तीव्र नापसंती दाखविण्यासाठी अथल्याने आपले कपडे फाडले आणि “फितुरी! फितुरी!” असे ती ओरडली.

See the chapter Copy




२ इतिहास 23:13

Follow us:

Advertisements


Advertisements