Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 19:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 शहरात राहणाऱ्या तुमच्या लोकांकडून तुमच्यासमोर येणार्‍या प्रत्येक बाबतीत—मग तो रक्तपात असो किंवा कायद्याच्या संबंधात, आज्ञा, हुकूम किंवा नियम—तुम्ही याहवेहविरुद्ध पाप करू नका अशी ताकीद तुम्ही त्यांना द्यावी; नाहीतर त्यांचा राग तुमच्यावर आणि तुमच्या लोकांवर येईल. हे असे करा म्हणजे तुम्ही पातक करणार नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तुमचे भाऊबंद जे आपापल्या नगरात राहत आहेत, त्यांच्यापैकी कोणाचा वाद तुमच्यापुढे आला तर, तो मग खुनाचा असो; किंवा नियमशास्त्र, आज्ञा, नियम व निर्णय ह्यांच्यासंबंधीचा असो; तुम्ही त्यांना असे बजावून सांगा की तुम्ही परमेश्वराचा अपराध करू नका; केला तर तुमच्यावर व तुमच्या बांधवांवर त्याचा कोप होईल; असे करा म्हणजे तुम्हांला दोष लागणार नाही.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 खुनाचा वाद, कायदा, नियम, आज्ञा, किंवा एखादा न्याय यासंबंधी तुमच्याकडे वाद येतील. हे वाद नगरात राहणाऱ्या तुमच्या बांधवांकडूनच उपस्थित केले जातील. अशा सर्वबाबतीत प्रत्येक वेळी लोकांस सांगा की त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप करु नये. हे तुम्ही निष्ठेने पार पाडले नाहीत तर तुमच्यावर आणि या तुमच्या भाऊबंदांवर परमेश्वराचा कोप ओढवेल. एवढे करा म्हणजे तुमच्या मनात अपराधभाव राहणार नाही.

See the chapter Copy




२ इतिहास 19:10

Follow us:

Advertisements


Advertisements