Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 15:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जेव्हा आसाने हे शब्द आणि ओदेद संदेष्ट्याचा पुत्र अजऱ्याहची भविष्यवाणी ऐकली तेव्हा त्याला धीर आला. त्याने यहूदाह आणि बिन्यामीनच्या संपूर्ण देशातील आणि त्याने ताब्यात घेतलेल्या एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील गावांमधील अमंगळ मूर्ती काढून टाकल्या. त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशमंडपासमोर याहवेहची जी वेदी होती, तिची दुरुस्ती केली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 आसाने ही वचने व ओदेद संदेष्ट्याचा संदेश ऐकला, तेव्हा त्याला धीर आला व त्याने यहूदा व बन्यामीन ह्यांच्या सर्व प्रदेशातून आणि एफ्राइमाच्या डोंगरवटीतील जी नगरे त्याने घेतली होती त्यांतून सर्व अमंगळ वस्तू काढून टाकल्या आणि परमेश्वराची जी वेदी परमेश्वराच्या देवडीपुढे होती तिचा जीर्णोद्धार केला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आसास या शब्दांनी आणि ओदेद या संदेष्ट्याच्या संदेशाने धीर आला. त्याने यहूदा आणि बन्यामीन येथील अमंगळ मूर्ती हटवल्या. एफ्राइमचा जो डोंगराळ प्रदेश त्याने ताब्यात घेतला होता त्या प्रदेशातल्या गावांमधल्या मूर्ती पूर्णपणे काढून टाकल्या. मंदिराच्या प्रवेशद्वारातील परमेश्वराच्या वेदीची डागडुजी केली.

See the chapter Copy




२ इतिहास 15:8

Follow us:

Advertisements


Advertisements