२ इतिहास 10:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्याच्याबरोबर वाढलेल्या तरुणांनी उत्तर दिले, “हे लोक तुम्हाला म्हणाले आहेत की, ‘तुमच्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले होते, तर आता हे भारी जू तुम्ही हलके करावे.’ आता त्यांना सांग, ‘माझी करंगळी माझ्या पित्याच्या कमरेपेक्षाही जाड आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या त्या तरुण पुरुषांनी त्याला उत्तर दिले, “हे लोक आपणाला म्हणतात की, ‘आपल्या बापाने आमच्यावर भारी जू लादले होते तर आता आपण ते हलके करा,’ तर त्यांना असे सांगा की माझी करांगुली माझ्या बापाच्या कंबरेपेक्षा मोठी आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा त्याच्या पिढीची ती युवा मंडळी रहबामाला म्हणाली, “तुमच्याकडे आलेल्या लोकांस तुम्ही असे सांगावे. लोक तुम्हास म्हणाले की, मानेवर जू ठेवल्याप्रमाणे तुमच्या वडिलांनी आम्हास कठोर जिणे जगायला लावले. तुम्ही आता ते हलके करावे असे आम्हास वाटते पण रहबाम, तुम्ही त्यांना असे सांगावे, माझी करंगळी माझ्या पित्याच्या कमरेपेक्षा जाड असेल. See the chapter |