१ इतिहास 13:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जमलेल्या संपूर्ण इस्राएली सभेपुढे दावीदाने असे भाषण केले, “जर तुम्हाला योग्य वाटते आणि आपल्या याहवेह परमेश्वरानेही या गोष्टीला संमती दिली आहे, त्याअर्थी आपल्यात सामील होण्यासाठी, आपण इस्राएलातील सर्व बंधूना, तसेच याजक, लेवी, जे त्यांच्यासह नगरात व मळ्यात आहेत त्यांना आमंत्रणाचा संदेश पाठवू या. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 दावीद इस्राएलाच्या सर्व मंडळीस म्हणाला, “तुम्हांला ठीक वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर ह्याची तशी मर्जी असेल तर इस्राएलाच्या सर्व प्रदेशात जे आपले बाकीचे भाऊबंद आहेत त्यांना आणि नगरात व त्यांच्या आसपासच्या खेड्यापाड्यांत जे याजक व लेवी राहत आहेत त्यांना निरोप पाठवू की, त्यांनी आपल्याला येऊन मिळावे, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग दावीदाने इस्राएलमधील सर्व मंडळीस म्हटले. “तुम्हास जर हे योग्य वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर याच्याकडून हे असेल तर आपले भाऊ, इस्राएलाच्या सर्व प्रदेशात राहिलेले आहेत त्यास आपापल्या नगरांत व खेड्यांत त्यांच्याबरोबर जे याजक आणि लेवी आहेत त्यांना आपणाकडे एकत्र जमण्यास त्यांच्याकडे दूत पाठवू. See the chapter |