Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 4:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मला सर्वकाही आहे व ते विपुल आहे; एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले त्याने मी भरून गेलो आहे. ते जणू काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक1 यज्ञ, असे आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 पण माझ्याजवळ सर्वकाही आहे आणि विपुल आहे आणि एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 माझ्याजवळ सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रदीतच्या हाती तुम्ही जे पाठविले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले आहे. ते जणू काही सुगंधित समर्पण असून देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 मजजवळ सर्वकाही आहे आणि ते भरपूर प्रमाणात आहे! एपफ्रदीत आला, तेव्हा त्याच्याबरोबर पाठविलेल्या देणग्यांमुळे मी अगदी भरून गेलो आहे. त्या देणग्या म्हणजे परमेश्वराला मान्य, संतोष देणारा सुगंधी यज्ञच आहेत.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 4:18
15 Cross References  

त्यानंतर वेदीवर सबंध मेंढ्याचा होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


आणि परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडेमेंढरे ह्यांचे परमेश्वराप्रीत्यर्थ हवन कराल, मग ते होमबलीचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या नेमलेल्या सणातला तो यज्ञ असो,


धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;


तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, “काय महाराज?” त्याने त्याला म्हटले, “तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत.


म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.


मी तुमची सेवा करावी म्हणून दुसर्‍या मंडळ्यांपासून वेतन घेऊन त्यांना लुटले;


ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरवल्या जातात; इतकेच केवळ नव्हे, तर तिच्या द्वारे देवाचे अधिकाधिक आभारप्रदर्शन झाल्याने ती सेवाही समृद्ध होते.


आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वत:ला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.


दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते; हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे.


बंधूंनो, आम्ही सर्वदा तुमच्याविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे; कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे, आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे.


चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.


तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात; ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


Follow us:

Advertisements


Advertisements