Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 3:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांचा निर्लज्जपणा हे त्यांचे भुषण आहे, ते जगिक गोष्टींवर चित्त ठेवतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 पोट हे त्यांचे दैवत असल्यामुळे नाश हा त्यांचा शेवट आहे. निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त केवळ ऐहिक गोष्टींवर असते.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्यांचा शेवट तर विनाश आहे, कारण पोट हेच त्यांचे दैवत आहे; निर्लज्जपणा त्यांचे गौरव आहे आणि त्यांचे मन भौतिक गोष्टींकडे लागलेले आहे.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 3:19
52 Cross References  

हे परमेश्वरा, आपले वतन इहलोकीच आहे असे ज्यांना वाटते, ज्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरतोस, अशा मानवांपासून ऐहिक मानवांपासून, आपल्या हाताने माझा जीव सोडव; ते आपल्या संततीतच तृप्त असोत, आणि आपण साठवलेले धन आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवोत;


हे बलवान पुरुषा, दुष्कर्माची आढ्यता का मिरवतोस? देवाचे वात्सल्य अखंड आहे.


आम्ही पूर्वी जसे केले, म्हणजे आम्ही, आमच्या पूर्वजांनी, आमच्या राजांनी व आमच्या सरदारांनी यहूदाच्या नगरांत व यरुशलेमेच्या आळ्यांत जसे केले त्याप्रमाणे आकाशराणीस धूप जाळण्याविषयी व तिला पेयार्पणे अर्पण करण्याविषयी आमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द आम्ही खरा करून दाखवू; कारण तेव्हा आम्हांला अन्नाची चंगळ असे, आमची आबादानी असे व आम्ही काही अनिष्ट पाहत नसू.


लबाडीस कान देणार्‍या माझ्या लोकांना तुम्ही लबाडी सांगून, जे मरू नयेत त्यांना मारून व जे जगू नयेत त्यांना वाचवून मूठभर जवासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी तुम्ही माझ्या लोकांसमोर माझा अवमान केला आहे.


तुम्ही मेंढरांचे मांदे खाता, त्यांच्या लोकरीची वस्त्रे वापरता; त्यांतली लठ्ठलठ्ठ पाहून कापता, परंतु कळपाला चारत नाही.


जसजशी ह्यांची संख्या वाढत गेली तसतसे ते माझ्याविरुद्ध पाप करीत गेले; मी त्यांचे वैभव पालटून त्याची अप्रतिष्ठा करीन.2


तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात, तिचे याजक वेतन घेऊन शिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात; तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की, “परमेश्वर आमच्या ठायी नाही काय? आमच्यावर काही अनिष्ट येणार नाही.”


जे संदेष्टे माझ्या लोकांना बहकवतात, काही चावण्यास मिळाले तर ‘कल्याण असो,’ असे जे म्हणतात व ज्याच्यापासून त्यांना चावण्यास मिळत नाही त्याच्याबरोबर लढण्याची जे तयारी करतात, त्यांच्याविषयी परमेश्वर असे म्हणतो.


पण तुम्ही म्हणता, परमेश्वराचे मेज विटाळले आहे; त्याचे उत्पन्न, त्याचे अन्न हे तुच्छ आहे; अशाने तुम्ही माझ्या नावाची अप्रतिष्ठा करता.


परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे.”


मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.


मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.’


कोणीएक श्रीमंत मनुष्य होता; तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करत असे.


पण काही काळपर्यंत तो ते करीना; परंतु नंतर त्याने मनात म्हटले, ‘जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानत नाही,


कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वत:च्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंत:करणे भुलवतात.


तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे? त्यांचा शेवट तर मरण आहे.


कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात; ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही? व मानवी रीतीने चालता की नाही?


तरीही तुम्ही फुगला आहात! आणि हे कर्म करणारा आपणांतून घालवून देण्याइतका शोक तुम्ही केला नाही.


तुमचे हे आढ्यता बाळगणे बरे नव्हे. थोडे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?


जे मी करतो ते करत राहीन; अशा हेतूने की ज्यांना निमित्त पाहिजे त्यांना मी निमित्तच मिळू देऊ नये, म्हणजे ज्या बाबतीत ते प्रौढी मिरवतात, त्या बाबतीत त्यांनी आमच्यासारखेच आढळून यावे.


म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही; त्यांचा शेवट त्यांच्या कर्मांप्रमाणे होईल.


कारण सुंता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळत नाहीत, तर तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी तुमची सुंता व्हावी अशी इच्छा बाळगतात.


कारण सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात;


वरील गोष्टींकडे मन लावा. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.


आपल्या पवित्र जनांच्या ठायी गौरव मिळावा म्हणून, आणि त्या दिवशी विश्वास ठेवणार्‍या सर्वांच्या ठायी आश्‍चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल, कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.


ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनीतीत संतोष मानला त्या सर्वांना शासन व्हावे म्हणून असे होईल.


मग तो अनीतिमान पुरुष प्रकट होईल, त्याला प्रभू येशू ‘आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील’, आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील.


मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या, भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणार्‍या माणसांची एकसारखी भांडणे होतात; [त्यांच्यापासून दूर राहा.]


विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी,


आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता; अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे.


तर (आपल्या) लोकांतही खोटे संदेष्टे होते तसे तुमच्यातही खोटे शिक्षक होतील; ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील; ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील, आणि आपणांवर आकस्मिक नाश ओढवून घेतील.


अनीतीचे वेतन म्हणजे अपकार हा त्यांच्या पदरी पडतो; दिवसाढवळ्या चैनबाजी करण्यात ते सुख मानतात, ते डाग व कलंक आहेत; तुमच्याबरोबर मेजवान्या झोडताना ते कपटाने वागतात व त्यांत त्यांना मौज वाटते.


ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील; त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.


तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत त्यांची हे निंदा करतात आणि ज्या गोष्टी बुद्धिहीन पशूंप्रमाणे ह्यांना स्वभावत: समजतात त्यांच्या योगे हे आपला नाश करून घेतात.


ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत; तोंडाने ते फुशारकी मारतात; व लाभासाठी ते तोंडपुजेपणा करतात.


कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत; ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात; आणि एकच स्वामी देव व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ते नाकारतात.


ज्या मानाने तिने आपला गौरव केला व विषयभोग घेतला, त्या मानाने तिला पीडा व दुःख द्या; कारण ती ‘आपल्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे; मी काही विधवा नाही; मी दुःख पाहणारच नाही.’


मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील.


माझ्या मंदिरात जी होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण करण्याची मी आज्ञा दिली आहे त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे इस्राएल लोक ह्यांनी केलेल्या अर्पणांपैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करीत आहेस?


Follow us:

Advertisements


Advertisements