Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 3:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तथापि, आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे एकचित्ताने पुढे चालावे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तथापि आपण ज्या विचाराने येथवर मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 तथापि, आपण आत्तापर्यंत जी मजल मारली, त्याप्रमाणे पुढे जात राहू या.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 जसे येथवर आपण पोहोचलो आहोत त्याप्रमाणे चालत राहावे.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 3:16
14 Cross References  

परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. स्वत:ला शहाणे समजू नका.


आता तुम्ही एकमताने व एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचा गौरव करावा म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करो की, ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे.


तुम्ही चांगले धावत होता; मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हांला कोणी अडथळा केला?


जितके ह्या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो.


सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकजिवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर राहता;


तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा; अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा.


मी युवदीयेला विनंती करतो व सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूच्या ठायी एकचित्त व्हा.


तर ख्रिस्त येशू जो प्रभू, ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा;


प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकारस्तुती करत जागृत राहा;


म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस ह्याची आठवण कर; ते जतन करून ठेव व पश्‍चात्ताप कर; कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन; मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हे तुला मुळीच कळणार नाही.


Follow us:

Advertisements


Advertisements