Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 1:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार; आणि विश्वासात तुम्हांला वृद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार आहे आणि विश्वासात तुमची प्रगती व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार आणि श्रद्धेमधील तुमची प्रगती व आनंद वाढत जावा म्हणून मी तुम्हां सर्वांजवळ राहणार, हे मला ठाऊक आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 मला माहीत आहे की, तुमची प्रगती आणि विश्वासातील तुमच्या आनंदासाठी मी येथे तुम्हाजवळ राहीन.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 1:25
17 Cross References  

देव आपल्या पवित्रतेला अनुसरून1 म्हणाला, “मी उल्लासेन; मी शखेम विभागीन व सुक्कोथाचे खोरे मोजून देईन;


परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.”


तो तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला; आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की, ‘दृढ निश्‍चयाने प्रभूला बिलगून राहा.’


आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, ‘विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.’


आणि आता पाहा, ज्यांच्यामध्ये मी देवाच्या राज्याची घोषणा करत फिरलो त्या तुमच्या कोणाच्याही दृष्टीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही, हे मला ठाऊक आहे.


आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हांला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.


ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही; तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्याने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या सामर्थ्याने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो; ते हे की, यरुशलेमेपासून सभोवती इल्लूरिकमापर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे.


आणि जेव्हा मी तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या [सुवार्तेच्या]आशीर्वादाच्या परिपूर्णतेने भरलेला असा येईन हे मला ठाऊक आहे.


आपण ज्या कृपेमध्ये आहोत, तिच्यात आपला प्रवेशही त्याच्या द्वारे विश्वासाने झाला आहे; आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो.


आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवतो असे नाही, तर तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहोत; तुमची स्थिती आहे ती विश्वासाने आहे.


तरी मी देहात राहणे हे तुमच्याकरता अधिक गरजेचे आहे.


तरी प्रभूमध्ये मला भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर येईन.


त्यातल्या त्यात माझी राहण्याची व्यवस्था करून ठेव, कारण तुमच्या प्रार्थनांच्या द्वारे माझे तुमच्याकडे येणे होईल1 अशी मला आशा आहे.


त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता; आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता; आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवांचे तारण, ते उपभोगत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्लासता.


Follow us:

Advertisements


Advertisements