Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 1:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 पण जर मी देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे; तर, कोणते निवडावे हे मला समजत नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 पण देहात जगण्यामुळे मला अधिक चांगले काम करता येणार असले, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 जर मला हे दैहिक जीवन जगायचे आहे, तर ते माझ्यासाठी श्रमाचे फळ ठरेल. मी काय निवडू? हे मला कळत नाही!

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 1:22
14 Cross References  

अबीमलेख म्हणाला, “हे कोणी केले हे मला ठाऊक नाही; तुम्ही मला हे कधी सांगितले नव्हते; आणि मीही हे ऐकले नव्हते, आजच ऐकले.”


पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, “हे पाहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे ह्याचे माझ्या धन्याला भानसुद्धा नाही; आपले सर्वकाही त्याने माझ्या हाती दिले आहे.


मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांना तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नकोस.


मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, “ऊठ, आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव; कारण आम्हांला मिसर देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले हे आम्हांला कळत नाही.”


बंधुजनहो, तुम्ही, तसेच तुमच्या अधिकार्‍यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे.


बंधुजनहो, इतर परराष्ट्रीयांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला (पण आतापर्यंत मला अडथळे आले), ह्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.


देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ‘त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही.’ एलीयाच्या बाबतीत शास्त्र काय म्हणते हे तुम्हांला ठाऊक नाही काय? इस्राएलाविरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली की,


कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो.


मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वत:ला माझ्याकरता दिले.


मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे.


तरी मी देहात राहणे हे तुमच्याकरता अधिक गरजेचे आहे.


कारण तुमच्यासाठी, लावदिकीया येथील लोकांसाठी, व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे, हे तुम्हांला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे.


ह्यासाठी की, तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे.


Follow us:

Advertisements


Advertisements