Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 4:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 माझ्या शब्दांमधून व कृतीमधून माझ्याकडून जे तुम्ही शिकलात व जे तुम्ही स्वीकारले ते आचरणात आणा म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 माझ्यापासून जे तुम्ही शिकलात, जे स्वीकारलेत, व माझे जे ऐकलेत, पाहिलेत ते आचरत राहा; म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचरीत राहा आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 माझ्यापासून तुम्ही जे सर्वकाही शिकला किंवा स्वीकारले किंवा ऐकले, किंवा मजमध्ये पाहिले त्यानुसार आचरण करा आणि शांती देणारे परमेश्वर तुम्हाबरोबर राहतील.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 4:9
36 Cross References  

पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ ‘आमच्याबरोबर देव’ असा आहे.


जे काही मी तुम्हांला आज्ञापूर्वक सांगितले आहे, ते सर्व त्यांना पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या अंतापर्यंत मी सर्वदा तुमच्याबरोबर आहे.”


‘प्रभो, प्रभो’, म्हणून माझा धावा करणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करील असे नाही, पण जो माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तो करील.


तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो, ते का करत नाही?


त्याने त्या सर्वांना उत्तर दिले, “हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे बंधू आहेत.”


जर ह्या गोष्टी तुम्हांला समजल्या, तर त्या केल्याने तुम्ही किती धन्य ठराल!


तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझे मित्र आहात.


त्याची आई नोकरांना म्हणाली, “तो तुम्हांला जे काही सांगेल ते करा.”


ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे ते तुला सांगण्यात येईल.”


शांतिदाता परमेश्वर तुम्हां सर्वांबरोबर असो. आमेन.


शांतिदाता देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह सर्वांवर असो.


तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता, ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.


कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही, तर तो शांतीचा देव आहे. पवित्र जनांच्या प्रत्येक ख्रिस्तमंडळीत जशी रीत आहे,


म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा.


बंधुजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण होवो, तुम्हांला पूर्णता लाभो, माझ्या आवाहनांकडे लक्ष द्या. तुम्ही एकचित्त व्हा. शांतीने राहा म्हणजे प्रेमस्वरूप व शांतिदाता देव तुमच्यासोबत राहील.


बंधूंनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हांला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या.


म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित राखील.


तुमचा छळ होत असतानाही तुम्ही देवाचा शद्ब पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन आनंदाने स्वीकारला आणि आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात.


बंधूंनो, यहूदीयातील देवाच्या ज्या ख्रिस्तमंडळ्या ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे झालात म्हणजे त्यांनी यहुदी लोकांच्या हातून जी दुःखे सोसली तीच तुम्हीदेखील आपल्या देशबांधवांच्या हातून सहन केलीत.


शांतिदाता देव स्वतः तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही संपूर्णपणे निर्दोष राखो.


तुमच्याविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हांला आज्ञा देऊन जे सांगतो, ते तुम्ही करीत आहात व पुढेही करीत राहाल.


प्रभू तुमच्या आत्म्याबरोबर राहो. तुम्हांला देवाची कृपा मिळो.


वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता.


तर मग बंधूंनो, तुम्हांला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे कधीही पतन होणार नाही


आपण जे काही मागतो, ते त्याच्याकडून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते, ते करतो.


Follow us:

Advertisements


Advertisements