Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 4:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 तुमची सहनशीलता सर्वांना कळो. प्रभू लवकरच येणार आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 सर्व लोकांस तुमची सहनशीलता कळून येवो; प्रभू समीप आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तुमची सौम्यता प्रत्येकाला दिसून येऊ द्या. प्रभू समीप आहेत.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 4:5
25 Cross References  

म्हणूनच मी तुम्हांला सांगतो, तुमच्या जीवनाविषयी, म्हणजे तुम्ही काय खावे व काय प्यावे आणि तुमच्या शरीराविषयी, म्हणजे तुम्ही काय परिधान करावे, ह्याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीवन आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक मौल्यवान आहे किंवा नाही?


म्हणून उद्याची चिंता करू नका. उद्याची चिंता उद्या. आजचे दुःख आजच्यासाठी पुरे!


तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित चैनबाजी, दारुबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांला अकस्मात गाठील.


जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नसेल, तर तो शापभ्रष्ट असो. आमच्या प्रभो, ये!


तुम्ही एकमेकांवर खटले भरता हे तुमच्या अपयशाचे लक्षण आहे. त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करत नाही? त्यापेक्षा झालेली फसवणूक का सोसून घेत नाही?


म्हणून अन्नामुळे माझा बंधू पापात पडत असेल, तर तो पापात पडू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही.


स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करतो, ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो.


मी पौल तुमच्यासमोर असताना तुमच्याशी लीनपणे व सौम्यतेने वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कठोरपणे वागतो, असे म्हटले जाते. मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हांला विनंती करतो.


तुम्ही एकदम मनात गोंधळून जाऊ नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे, अशा विचाराने चिंताग्रस्त होऊ नका. कदाचित आमच्याकडून आलेल्या भविष्यवाणीतून, प्रबोधनातून किंवा पत्रातून आम्हीच असे म्हटले, असा विचार केला जात असावा.


कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता शांतिप्रिय व स्नेहपूर्ण वर्तन ठेवून सर्व माणसांबरोबर सौजन्याने वागावे, ह्याचे त्यांना स्मरण दे;


आपल्यापैकी अनेक लोक करीत आहेत त्याप्रमाणे आपण एकत्र येत राहून प्रभूचा दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते, तसतसा एकमेकांना अधिक बोध करावा;


कारण धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, अगदी थोडा वेळ राहिला आहे; जो येणार आहे, तो येईल, उशीर करणार नाही;


त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता, त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी यांविषयी भाकीत केले तेव्हा त्याने कोणता अथवा कसा काळ सुचविला ह्याविषयी ते शोध करीत होते.


सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा.


ह्या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, “खरोखर. मी लवकर येत आहे.” आमेन. ये, प्रभू येशू, ये!


येशू म्हणतो, “ऐका! मी लवकर येत आहे! ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य!”


Follow us:

Advertisements


Advertisements