Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 4:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या खात्यात तुमची जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मी दानाची अपेक्षा करतो असे नाही; तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मी देणगीची अपेक्षा करतो असे नाही पण तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा करतो.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मला तुमची देणगी पाहिजे असे नाही, तर तुमच्या हिशेबी मोबदला वाढावा किंवा तुम्हाला लाभ व्हावा अशी मी अपेक्षा करतो.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 4:17
26 Cross References  

तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हांला निवडले आहे व तुम्हांला नेमले आहे, म्हणजे तुम्ही जावे. विपुल फळ द्यावे. तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल, ते त्याने तुम्हांला द्यावे.


तुम्ही विपुल फळ दिले तर माझ्या पित्याचा गौरव होईल. अशा प्रकारे तुम्ही माझे शिष्य व्हाल.


हे काम पूर्ण करून त्यांच्यासाठी जमा केलेला संपूर्ण निधी त्यांच्या पदरात टाकून झाला की, तुमच्याकडील मार्गाने मी स्पेन देशास जाईन.


मी पुन्हा म्हणतो, कोणी मला मूढ समजू नये. जर तुम्ही तसे समजत असाल, तर निदान जसा मूढाचा तसा माझा स्वीकार करा, म्हणजे मीही थोडीशी प्रौढी मिरवीन.


म्हणून तुम्ही पूर्वी जी देणगी जाहीर केली होती, ती जमा करून तयार ठेवावी, म्हणून तुमच्याकडे माझ्या अगोदर येण्याची बंधुवर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटले. मी येईन तेव्हा तुमची देणगी तयार असेल आणि हे निदर्शनास येईल की, तुमच्यांवर सक्ती केली आहे म्हणून नव्हे तर स्वेच्छेने तुम्ही दान देत आहात.


आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही नीतिमत्त्वाच्या फळांनी भरून जावे.


मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही. ज्या स्थितीत मी आहे, त्या स्थितीत मी समाधानी राहण्यास शिकलो आहे.


आम्ही आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो, हे तुम्हांला माहीत आहे. तसेच लोभ झाकण्याकरिता शब्द वापरत नव्हतो. देव आमचा साक्षी आहे!


तो मद्यपी किंवा हिंसक नसावा, तर सौम्य, शांतिप्रिय, द्रव्यलोभ न धरणारा,


कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे मूळ आहे, त्याच्या मागे लागून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी पुष्कळ दुःखांनी त्यांची हृदये विदीर्ण करून घेतली आहेत.


ख्रिस्तमंडळीचा बिशप हा देवाचा कारभारी आहे, म्हणून तो निर्दोष असला पाहिजे. तो उर्मट, रागीट, मद्यपी, हिंसक व पैशासाठी हपापलेला नसावा,


आपल्या लोकांनी आपल्या निकडीच्या गरजा पुरविल्या जाव्यात म्हणून चांगली कृत्येही करण्यास शिकावे, म्हणजे ते निष्फळ ठरणार नाहीत.


तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीती, हे विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.


तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करा, करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्यलोभाने नव्हे तर सेवावृत्तीने करा.


ते सरळ मार्ग सोडून बहकले आहेत आणि अनीतीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गाने गेले आहेत.


ते लोभ धरून बनावट गोष्टी तुम्हांला सांगून तुमच्याकडून पैसे मिळवतील. त्यांच्याकरिता नेमलेला दंड पहिल्यापासून विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही!


त्यांची केवढी दुर्दशा होणार! ते काइनच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामच्या चुकीच्या मार्गात बेफामपणे घुसले, आणि कोरहसारखे बंड करून त्यांनी त्याच्यासारखा आपला नाश करून घेतला.


Follow us:

Advertisements


Advertisements