Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 3:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 ह्या कुत्र्यांपासून सावध रहा, दुष्कर्म्यांपासून सावध रहा, केवळ शरीराला बाधा पोहचवणाऱ्यांपासून सावध रहा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्या कुत्र्यांविषयी सावध असा; त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा; केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध असा.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्या कुत्र्यांपासून सावध राहा. वाईट काम करणार्‍यांपासून सावध राहा. केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध राहा.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्या कुत्र्यांपासून, दुष्ट कृत्ये करणारे, देहाची विच्छिन्नता करणार्‍यांपासून सावध राहावे.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 3:2
31 Cross References  

त्या वेळी पुष्कळ जण श्रद्धेपासून ढळतील, एकमेकांना धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील.


खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषात तुमच्याकडे येतात पण ते आतून क्रुर लांडगे असतात.


जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका. तुमचे मोती डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर कदाचित त्यांच्या पायांखाली ती तुडवतील व उलटून तुमच्या अंगावर धावून येतील.


जो बाह्यस्वरूपाने यहुदी तो खरा यहुदी नव्हे आणि बाह्यस्वरूपाची सुंता ही खरी सुंता नव्हे.


हे बढाई मारणारे तोतये प्रेषित, फसवेगिरी करणारे कामगार आणि ख्रिस्ताचे प्रेषित असल्याचे सोंग घेणारे आहेत.


बंधुजनहो, तुम्हांला स्वातंत्र्यासाठी पाचारण केले आहे. परंतु त्या स्वातंत्र्याने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर एकमेकांची सेवा प्रीताने करा;


परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व गिळून टाकता तर सांभाळा, अन्यथा तुमच्या हातून एकमेकांचा संहार होईल.


कारण जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये असतो तेव्हा सुंता करून घेणे वा न करणे यामुळे काही फरक पडत नाही; प्रीतीद्वारे कार्य करणारा विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे.


पोट हे त्यांचे दैवत असल्यामुळे नाश हा त्यांचा शेवट आहे. निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त केवळ ऐहिक गोष्टींवर असते.


आपण खऱ्या अर्थाने सुंता झालेले, आत्म्याच्या प्रेरणेने देवाची आराधना करणारे, ख्रिस्त येशूमध्ये आनंद मानणारे व बाह्य गोष्टींवर भरवसा न ठेवणारे आहोत.


कित्येकांनी सदसद्विवेकबुद्धी झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले,


आपण देवाला ओळखतो असे ते जाहीर करतात परंतु कृतींनी त्याला नाकारतात. ते तिरस्करणीय व आज्ञाभंग करणारे असून प्रत्येक चांगल्या कामासाठी अपात्र आहेत.


‘आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे’ व ‘अंग धुतल्यानंतर चिखलात लोळण्यास परतलेली डुकरीण’, अशा ज्या म्हणी आहेत त्यांच्यासारखी त्यांची गत झालेली असते.


कित्येक नास्तिक माणसे चोरून आत शिरली आहेत. ही माणसे आपल्या देवाच्या कृपेच्या संदेशाचा विपर्यास करून त्यांच्या अनैतिक वर्तनाचे समर्थन करतात आणि ही माणसे आपला एकमेव मालक व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात. त्यांना दोषी ठरविण्यात आले, ही गोष्ट पूर्वीच पवित्र शास्त्रात भाकीत करून ठेवली आहे.


तुझे क्लेश व तुझी गरिबी मला ठाऊक आहे. तरी तू धनवान आहेस. जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवितात पण केवळ सैतानाच्या समुदायात सामील आहेत, असे लोक जी निंदा करतात, ती मला ठाऊक आहे.


परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.”


विकृत जन, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, शब्दाने व कृतीने लबाडी करणारे सर्व लोक ह्या नगरीच्या बाहेर राहतील.


ऐक! जे सैतानाच्या समुदायात असून आपणाला यहुदी म्हणवितात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन करीन. पाहा, ते तुझ्या पायांजवळ येऊन तुझी आराधना करतील व मी तुझ्यावर प्रीती केली आहे, हे त्यांना कळून चुकेल, असे मी करीन.


Follow us:

Advertisements


Advertisements