Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 3:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आत्ताही अश्रू ढाळीत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या क्रुसावरील मृत्यूचे वैरी आहेत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 कारण मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 कारण मी तुम्हास, पुष्कळ वेळा, सांगितले आणि आता रडत सांगतो की, पुष्कळजण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 कारण मी हे पूर्वी तुम्हाला सांगितले आणि आताही रडत सांगतो की अनेक लोक असे जगतात जसे ते ख्रिस्ताच्या क्रूसखांबाचे शत्रू आहेत.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 3:18
30 Cross References  

येशू नगरीजवळ आल्यावर तिच्याकडे पाहून तिच्याकरिता विलाप करीत म्हणाला,


म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि यहुदी लोकांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हांला ठाऊक आहे.


मला मोठे दु:ख वाटते व माझ्या अंतःकरणामध्ये अखंड वेदना होतात.


कारण ज्यांचा नाश होत आहे, त्यांना क्रुसाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे, अशा आपल्यासाठी तो देवाचे सामर्थ्य आहे, कारण


अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, समलिंगी, लैंगिक दृष्ट्या विकृत जन,


हे बढाई मारणारे तोतये प्रेषित, फसवेगिरी करणारे कामगार आणि ख्रिस्ताचे प्रेषित असल्याचे सोंग घेणारे आहेत.


एखादा दुर्बळ असला, तर मलाही दुर्बलता जाणवते आणि जर एखाद्याला पाप करण्याकरिता प्रवृत्त करण्यात आले, तर मला क्लेश होत नाहीत काय?


मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रू गाळीत तुम्हांला लिहिले होते. तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नव्हे, तर तुमच्यावर माझी जी विपुल प्रीती आहे, ती तुम्हांला कळून यावी म्हणून लिहिले.


खरे म्हणजे दुसरे शुभवर्तमान नाही, पण तुम्हांला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाचा विपर्यास करू पाहणारे असे कित्येक आहेत, म्हणून मी असे म्हणतो.


शुभवर्तमानाच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, असे जेव्हा मी पाहिले, तेव्हा सर्वांसमक्ष मी पेत्राला म्हटले, “तू यहुदी असताही यहुदीतर लोकांसारखा वागतोस, यहुदी लोकांसारखा वागत नाहीस, तर यहुदीतर लोकांनी यहुदी लोकांसारखे वागावे म्हणून तू त्यांना भाग पाडतोस, हे कसे?”


देवाच्या कृपेला निरर्थक ठरविणे मला मान्य नाही; कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राच्याद्वारे मिळते, तर ख्रिस्ताचे मरण अनावश्यक ठरते!


हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते, तेच आता सांगतो की, अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.


जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात, तितके ख्रिस्ताच्या क्रुसामुळे स्वतःचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हांला सुंता करून घेण्यास भाग पाडतात.


आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या क्रुसाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; कारण त्याच्या क्रुसाद्वारे जगाने मला क्रुसावर खिळले आहे व मी जगाला क्रुसावर खिळले आहे.


प्रभूच्या नावाने मी तुम्हांला ठामपणे सांगतो व आग्रह धरतो की, यहुदीतर लोक निरर्थक विचारांनी चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये.


पहिल्या दिवसापासून आजपर्यंत शुभवर्तमानाच्या प्रसारातील तुमच्या सहभागितेमुळे मी तसे करतो. तुम्हां सर्वांसाठी प्रत्येक प्रार्थनेच्या वेळेस मी नेहमी आनंदाने विनंती करतो.


कोणी ह्या गोष्टीचे उल्‍लंघन करून आपल्या बंधूंचा गैरफायदा घेऊ नये, हे आम्ही तुम्हांला अगोदरच सांगितले होते व प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, असे तुम्हांला शपथपूर्वक बजावले होते.


तुमच्यामध्ये कित्येक आळशीपणाने वागणारे असून ते मुळीच काम न करता लुडबूड करतात, असे ऐकतो, म्हणून आम्ही हे सांगत आहोत.


विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या मागे लागणारे व देवाचा अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. हे खोटे धर्मशिक्षक उद्धट, स्वच्छंदी आणि थोरांची निंदानालस्ती करण्यास न भिणारे असे आहेत.


हे लोक समुद्राच्या विक्राळ लाटांसारखे आहेत. त्यांची लज्जास्पद कृत्ये लाटांच्या फेसाप्रमाणे वर आलेली दिसतात. ते भ्रमण करणाऱ्या ताऱ्यांसारखे आहेत. त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे.


Follow us:

Advertisements


Advertisements