Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 3:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी परंतु तुमची एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती असली, तर देव तेही तुम्हांला दाखवील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तर जेवढे आपण पोक्त आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली, तरी देव तीही तुम्हांला प्रकट करील.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तर जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली, तरी देव तेही तुम्हास प्रकट करील.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 आपण जे सर्व परिपक्व आहोत त्यांनीही हाच भाव ठेवावा. जर एखाद्या गोष्टीसंबंधाने तुमचे विचार वेगळे असतील तर परमेश्वर ती गोष्ट तुम्हाला स्पष्ट करतील.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 3:15
21 Cross References  

म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता पूर्ण आहे, तसे तुम्ही पूर्ण व्हा.


तुम्ही वाईट असताही तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यायचे कळते, तर मग स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती अधिक प्रमाणात पवित्र आत्मा देईल.”


संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे की, ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो पित्याचे ऐकून शिकला आहे, तो माझ्याकडे येतो.


जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करायची मनीषा बाळगील त्याला ही शिकवण देवाकडून आहे किंवा मी माझ्या स्वतःचे बोलतो, हे समजेल.


आपण जे सशक्त आहोत त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे.


बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका. दुष्टपणाबाबत लहान मुलांसारखे आणि समजूतदारपणात प्रौढांसारखे व्हा.


तथापि तुमच्यात जे अधिक ज्ञानी आहेत, त्यांना मी ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान ह्या युगाचे किंवा ह्या युगाचे नष्ट होणारे जे अधिपती त्यांचेही नव्हे,


मला प्रभूमध्ये तुमच्याविषयी खातरी आहे की, तुम्ही दुसरा विचार करणार नाही, तुमचे मन अस्थिर करणारा कोणी का असेना, त्याला देव शिक्षा करील.


आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हांला त्याच्या स्वरूपाविषयीचे ज्ञान व प्रकटीकरण देणारा पवित्र आत्मा द्यावा.


ख्रिस्त येशूमध्ये प्रत्येक माणसाने परिपूर्ण झालेले असे आम्हांला सादर करता यावे म्हणून आम्ही सर्वांना ख्रिस्ताची घोषणा करतो, प्रत्येक माणसाला सावध करतो व प्रत्येक माणसाला सर्व प्रकारच्या ज्ञानाने सुशिक्षित करतो.


ख्रिस्त येशूचा सेवक एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे, तो तुम्हांला शुभकामना पाठवतो. तो आपल्या प्रार्थनेमध्ये सर्वदा तुमच्यासाठी आस्थेने विनंती करीत असतो की, त्याच्या इच्छेचे परिपूर्ण पालन करण्यासाठी प्रौढ व दृढनिश्चयी ख्रिस्ती म्हणून देवाने तुम्हांला स्थिर करावे.


बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हांला लिहावे, ह्याची तुम्हांला गरज नाही, कारण एकमेकांवर कशी प्रीती करावी, हे तुम्हांला देवाने शिकविले आहे.


ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्णपणे निपुण ठरून प्रत्येक चांगल्या कामासाठी सुसज्ज व्हावा.


पण ज्यांना विवेकदृष्टीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे, अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.


जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्याशी एकनिष्ठ आहोत.


Follow us:

Advertisements


Advertisements