Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 2:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 म्हणून परमेश्वराने त्यांना अत्युच्च स्थानी ठेवले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले;

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 2:9
46 Cross References  

माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही. पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही.


तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.


माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहे. पुत्र कोण आहे, हे पित्यावाचून कोणाला ठाऊक नाही आणि पिता कोण आहे, हे पुत्रावाचून व ज्याला तो प्रकट करायची पुत्राची इच्छा असेल, त्याच्यावाचून कोणाला ठाऊक नाही.”


आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे व आपण देवाकडून आलो आहोत व देवाकडे जात आहोत हे जाणून


ह्यापुढे मी जगात नाही परंतु ते मात्र ह्या जगात आहेत. आता मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे म्हणून, तू मला दिलेल्या तुझ्या नावाने त्यांचे संरक्षण कर.


जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो, तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावाने मी त्यांचे संरक्षण केले. मी त्यांचा सांभाळ केला. ज्याचा विनाश अटळ आहे त्याच्याशिवाय त्यांच्यामधील कोणीही हरवला नाही. धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले.


हे माझ्या पित्या, जगाच्या निर्मितीपूर्वी तुझ्याबरोबर माझे जे वैभव होते, तेच वैभव तुझ्या उपस्थितीत मला आता दे.


त्याने इस्राएलला पश्चात्ताप व पापांची क्षमा द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले.


ही योजना म्हणजे स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे, ते सर्व ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली एकत्रित करावे. योग्य वेळी परमेश्वर हे पूर्ण करील.


तो त्याच्या शरीराचे म्हणजे ख्रिस्तमंडळीचे मस्तक व उगमस्थान आहे. तो मृतांतून प्रथम जन्मलेला आहे. अशासाठी की, सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे;


अशा प्रकारे आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपल्या प्रभू येशूच्या नावाला तुमच्यामध्ये व तुम्हांला त्याच्यामध्ये गौरव मिळेल.


पुत्राला देवाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ केले आहे - अगदी त्यांच्या नावापेक्षा अधिक श्रेष्ठ नाव त्याला दिले आहे तसे.


तुला न्यायाची चाड आणि वाइटाचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ अशा आनंददायक तेलाचा अभिषेक तुला केला आहे.


आपण आपला विश्वास उत्पन्न करणारा व पूर्ण करणारा येशू ह्याच्यावर लक्ष केंद्रित करावे. जो आनंद त्याच्यापुढे होता, त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून क्रूस सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.


देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा अल्पावधीसाठी कमी केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे वैभव व सन्मान ह्यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो.


येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश यांच्यावर तो सत्ता चालवितो.


त्याला देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाला, तेव्हा सर्वोच्च गौरवशाली देवाकडून अशी वाणी झाली की, ‘हा माझा पुत्र आहे, तो मला परमप्रिय आहे, मी त्याच्यावर प्रसन्न आहे!’


कारण ते यहुदीतर लोकांपासून काहीच न घेता ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी बाहेर पडले आहेत.


आणि विश्वसनीय साक्षीदार, मेलेल्यांमधून प्रथम उठविला गेलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपतीदेखील असलेला येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो; ज्याने स्वतःच्या रक्ताने आपल्याला पापांतून मुक्त केले आहे


सातव्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा स्वर्गात जोरदार आवाज ऐकू आले. ते म्हणाले, “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे आणि तो युगानुयुगे राज्य करील!”


त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर ‘राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू’ हे नाव लिहिलेले होते.


मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो आहे, तसा जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या राजासनावर माझ्याबरोबर बसण्याचा अधिकार देईन.


ते उच्च स्वरात गात होते, “वधलेले कोकरू सामर्थ्य, धन, सुज्ञता, पराक्रम, सन्मान, गौरव व धन्यवाद हे स्वीकारण्यास पात्र आहे!”


Follow us:

Advertisements


Advertisements