Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 2:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे, असे त्याने मानले नाही,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 ते खुद्द परमेश्वराच्या स्वरुपाचे असूनही त्यांनी स्वतःस परमेश्वरासमान केले नाही व परमेश्वरासम असण्याचा लाभ त्यांनी घेतला नाही;

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 2:6
37 Cross References  

पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ ‘आमच्याबरोबर देव’ असा आहे.


देवाला कोणी कधी पाहिले नाही. जो एकुलता एक पित्याच्या उराशी असतो त्याने पित्याला प्रकट केले आहे.


मी आणि पिता एक आहोत.”


त्यांनी त्याला उत्तर दिले, “चांगल्या कृत्यांसाठी आम्ही तुम्हांला दगड मारत नाही, तर दुर्भाषणासाठी! कारण तुम्ही केवळ मानव असून स्वतःला देव म्हणवता.”


परंतु जर मी ती करतो, तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी निदान त्या कृत्यांवर विश्वास ठेवा. या मागचा हेतू हा की, माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे, हे तुम्ही ओळखून व समजून घ्यावे.”


मी आता जातो आणि तुमच्याकडे येईन, असे जे मी तुम्हांला सांगितले, ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असेल तर मी पित्याकडे जात आहे, ह्याचा तुम्हांला आनंद होईल, कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.


येशूने उत्तर दिले, “फिलिप, मी इतका दीर्घकाळ तुमच्याबरोबर असून तू मला अजूनही ओळखत नाहीस? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्याला पाहिले आहे, तर आम्हांला पिता दाखवा, असे तू का म्हणतोस?


हे माझ्या पित्या, जगाच्या निर्मितीपूर्वी तुझ्याबरोबर माझे जे वैभव होते, तेच वैभव तुझ्या उपस्थितीत मला आता दे.


थोमाने त्याला म्हटले, “माझा प्रभू व माझा देव!”


ह्यामुळे त्याला ठार मारावे म्हणून यहुदी लोक अधिकच प्रयत्न करू लागले; कारण तो साबाथ मोडत असे. इतकेच नव्हे, तर देवाला आपला पिता संबोधून स्वतःला देवासमान मानत असे.


ह्यासाठी की, जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने त्याला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही.


महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे, तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ असून युगानुयुगे धन्य असा देव आहे. आमेन.


त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची तंतोतंत प्रतिमा असलेल्या ख्रिस्ताच्या वैभवशाली शुभवर्तमानाचा प्रकाश त्यांच्यावर पडू नये.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरिता गरीब झाला, अशा हेतूने की, त्याच्या गरिबीने तुम्ही धनवान व्हावे.


शाश्वत राजा, अविनाशी आणि अदृश्य असा एकच देव ह्याचा सन्मान व गौरव युगानुयुगे होवो! आमेन.


आपल्या धर्माचे रहस्य निर्विवाद मोठे आहे: येशू देहात प्रकट झाला, पवित्र आत्म्याने त्याचे समर्थन केले तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची यहुदीतर लोकांत घोषणा झाली, जगभर त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि तो वर घेतला गेला.


तो परमेश्वराच्या वैभवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने विश्वाधार आहे आणि माणसांच्या पापांची क्षमा केल्यावर तो ऊर्ध्वलोकी सर्वसमर्थ परमेश्वराच्या उजवीकडे बसला आहे.


परंतु तो प्रथम जन्मलेल्या पुत्राला जगात आणताना म्हणतो: देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत.


परंतु पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, हे देवा, तुझे राजासन युगानुयुगांचे आहे आणि तुझा राजदंड न्यायाचा राजदंड आहे.


येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुगे सारखाच आहे.


तो पुढे म्हणाला, “झाले! मी पहिला व शेवटचा, प्रारंभ व अंत आहे. मी तान्हेल्याला जीवनाच्या झऱ्याचे पाणी विनामूल्य देईन.


Follow us:

Advertisements


Advertisements