Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 2:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 त्याचे स्वागत प्रभूला स्मरून पूर्ण आनंदाने करा आणि त्याच्यासारख्या सर्वांचा सन्मान करा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 ह्यावरून प्रभूच्या ठायी त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा; आणि अशांचा मान राखा;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 ह्यावरून पूर्ण आनंदाने तुम्ही त्याचे प्रभूमध्ये स्वागत करा. अशांचा मान राखा.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 प्रभूमध्ये मोठ्या आनंदाने त्याचे स्वागत करून त्याच्यासारख्यांचा सत्कार करा.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 2:29
21 Cross References  

जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष म्हणून त्या नगरातून निघते वेळेस तुमच्या पायांची धूळ झटकून टाका.”


मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी ज्याला पाठवतो, त्याचा जो स्वीकार करतो तो माझाही स्वीकार करतो आणि जो माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो.”


ते दररोज मंदिरात एकत्र जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि आनंदी व विनम्र वृत्तीने अन्न खात असत.


तेव्हा त्यांनी आमचा नाना प्रकारे सन्मान केला आणि आम्ही जहाजाने जायला निघालो तेव्हा आमच्या गरजेच्या वस्तू त्यांनी जहाजावर भरल्या.


त्या नगरात आनंदीआनंद झाला.


घोषणा करणाऱ्यांवाचून ते कसे ऐकतील? ‘शुभवर्तमान सांगणाऱ्याचे पाय किती सुंदर असतात!’ असा धर्मशास्त्रलेख आहे.


तुम्ही पवित्र जनांस योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल, त्या त्या कामात तिला साहाय्य करावे कारण ती स्वतः पुष्कळ जणांना व मलाही साहाय्य करत आली आहे.


तेथे तीमथ्य आल्यास त्याने तुमच्याजवळ आपल्याच घरी असल्यासारखे राहावे, असे त्याचे आदरातिथ्य करा; कारण माझ्याप्रमाणे तोही प्रभूचे कार्य करीत आहे.


त्यांनी जसा तुम्हांला हुरूप आणला होता, तसाच मलाही हुरूप आणला आहे, म्हणून तुम्ही अशांची दखल घ्या.


आत्मप्रौढी करणाऱ्यांना मान्यता मिळत नाही, तर ज्यांची प्रभू शिफारस करतो, त्यांना मिळते.


तुम्ही आमचा अंगिकार करा, आम्ही कोणावर अन्याय केला नाही. कोणाचे नुकसान केले नाही, कोणाचा गैरफायदा घेतला नाही.


मी त्याला पाठविण्याची त्वरा करीत आहे, तुम्ही त्याला पाहून आनंदित व्हावे व माझे दुःख हलके करावे.


माझ्याबरोबर तुरुंगात असलेला अरिस्तार्ख तुम्हांला शुभेच्छा देतो. तसेच बर्णबाचा भाऊबंद मार्क हादेखील तुम्हांला शुभेच्छा कळवतो. त्याच्याविषयी तुम्हांला निर्देश देण्यात आला आहे की, तो तुमच्याकडे आला तर त्याचे स्वागत करा.


बंधुंजनहो, आम्ही तुम्हांला विनंती करतो की, तुमच्यामध्ये जे श्रम करतात, प्रभूवरील श्रद्धेपोटी तुमच्यावर अधिकार चालवितात व तुम्हांला बोध करतात त्यांचा तुम्ही सन्मान करावा;


जे वडीलजन चांगल्या प्रकारे आपली सेवा करतात, विशेषकरून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात त्यांना दुप्पट सन्मान मिळावा;


तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे, हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात; ते त्यांना आनंदाने करता यावे, दुःखी मनाने नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.


ह्यामुळे जर मी आलो तर तो जी कृत्ये करतो, त्याकडे लक्ष वेधीन. तो आम्हांला त्रासदायक होतील अशा मूर्खपणाच्या गोष्टी सांगतो. तेवढ्याने त्याचे समाधान होत नाही. तो बंधुजनांचा स्वीकार स्वतःही करीत नाही आणि जे त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांनाही तो करू देत नाही व ख्रिस्तमंडळीतून बाहेर घालवून देतो.


Follow us:

Advertisements


Advertisements