Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 2:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 जे काही तुम्ही कराल, ते कुरकुर व वादविवादाशिवाय करा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 जे काही तुम्ही कराल कुरकुर आणि वादविवाद न करता करा;

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जे काही कराल ते सर्व कुरकुर व वादविवाद न करता करा,

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 2:14
36 Cross References  

ती घेतल्यावर ते घरधन्याविरुद्ध कुरकुर करत म्हणाले,


ते तीनशेपेक्षा अधिक चांदीच्या नाण्यांना विकून गोरगरिबांना मदत करता आली असती”, अशी ते तिच्यावर टीका करीत होते.


ते इतर शिष्यांजवळ आले, तेव्हा त्यांच्याभोवती लोकसमुदाय आहे व त्यांच्याबरोबर काही शास्त्री वादविवाद करत आहेत, असे त्यांना दिसून आले.


काही परुशी व त्यांचे शास्त्री हे येशूच्या शिष्यांच्या विरुद्ध कुरकुर करीत त्यांना म्हणाले, “जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता?”


तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी तीव्र मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्या वादासंबंधाने यरुशलेममधले प्रेषित व वडीलवर्ग ह्यांच्याकडे जावे.


ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद निर्माण होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा योहान ऊर्फ मार्कला घेऊन तारवात बसून कुप्र येथे गेला.


पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला, “बंधुजनहो, तुम्हांला ठाऊक आहे की, माझ्या तोंडून शुभवर्तमान ऐकून यहुदीतरांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीच्या दिवसांपासून देवाने तुमच्यामधून माझी निवड केली.


काही दिवसांनंतर श्रद्धावंतांची संख्या वाढत चालली असता ग्रीक यहुदी लोकांची स्थानिक हिब्रू लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली कारण रोजच्या दानधर्म वाटणीत त्यांच्या मते त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे.


सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा.


जो विश्वासात दुर्बल आहे त्याला जवळ करा, पण व्यक्तिगत मतांविषयी वाद घालू नका.


आता बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हांला शिक्षण मिळाले आहे, त्याविरुद्ध जे फूट पाडतात व अडथळे आणतात त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर राहा;


त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, म्हणून तशी कुरकुर आपण करू नये.


मला भीती वाटते की, मी आल्यावर जशी माझी अपेक्षा आहे, तसे कदाचित तुम्ही मला दिसून येणार नाही आणि तुमची अपेक्षा नाही, तसा मी तुम्हांला दिसून येईन. कदाचित भांडणतंटे, मत्सर, राग, स्वार्थी वृत्ती, निंदानालस्ती, गप्पाटप्पा, घमेंड व गैरवागणूक हे सारे मला आढळून येईल.


परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व गिळून टाकता तर सांभाळा, अन्यथा तुमच्या हातून एकमेकांचा संहार होईल.


आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांविरुद्ध स्पर्धा करणारे व एकमेकांचा हेवा करणारे असू नये.


स्वार्थी महत्त्वाकांक्षेने अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, परत स्वतःपेक्षा दुसऱ्यांना लीनतेने श्रेष्ठ माना.


त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने सर्वोच्च मान द्यावा. तुम्ही आपसात शांतीने राहा.


कोणी कोणाचे वाइटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा; सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत राहा.


सर्वांबरोबर शांतीने राहण्याचा व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही, ते पवित्रीकरण मिळविण्याचा झटून प्रयत्न करा;


कारण माणसाच्या रागाने देवाचे नीतिमत्व निर्माण होत नाही.


पण तुमच्या मनात कटु मत्सर व स्वार्थी महत्त्वकांक्षा आहे तर सुज्ञतेचा ताठा मिरवून सत्याविरुद्ध पाप करू नका.


बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका. पाहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे.


त्याने वाइटाकडे पाठ फिरवून चांगले ते करावे. त्याने शांती मिळवण्यासाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.


कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा.


हे लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत, तोंडाने ते फुशारकी मारतात व लाभासाठी ते तोंडपुजेपणा करतात.


Follow us:

Advertisements


Advertisements