Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 2:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 प्रियजनहो, मी तुमच्याजवळ असता तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात. तर विशेषकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही तुम्ही आज्ञापालन करावे, हे अधिक महत्त्वाचे आहे. आपले तारण पूर्णत्वास नेण्यासाठी भयाने थरकाप होत असतानाही श्रम करीत राहा;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 म्हणून माझ्या प्रिय जनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषेकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कापत आपले तारण साधून घ्या;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 म्हणून माझ्या प्रियांनो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहा, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विषेशकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कांपत आपले तारण साधून घ्या.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 यास्तव, प्रिय मित्रांनो, मी तिथे तुम्हाबरोबर असताना आणि याहीपेक्षा माझ्या अनुपस्थितीत तुम्ही नेहमीच आज्ञापालन केले आहे, म्हणून तुमच्या तारणाचे कार्य भयात व कापत साधून घ्या.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 2:12
41 Cross References  

बाप्तिस्मा देणारा योहान ह्याच्या दिवसांपासून आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावत आहेत.


मी मनाचा सौम्य व लीन आहे. माझे जू आपल्यावर घ्या व माझ्याकडून शिका म्हणजे तुमच्या जिवाला विसावा मिळेल;


दिवे मागवून तो तुरुंगाधिकारी आत धावत गेला; कापत कापत पौल व सीला यांच्या पाया पडला


ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे ते तुला सांगण्यात येईल.”


जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अमरत्व हे सारे मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो शाश्वत जीवन देईल.


म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, स्थिर आणि अढळ राहा. प्रभूच्या कार्यात सतत मग्न राहा; कारण तुम्ही जाणून आहात की, प्रभूमध्ये तुम्ही केलेले श्रम कधीच व्यर्थ ठरणार नाहीत.


आणि मी तुमच्याकडे अशक्त, भयभीत व अतिकंपित अवस्थेत आलो.


तुम्हांला लाजवण्यासाठी मी हे लिहीत नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हांला बोध करण्यासाठी लिहितो;


आदरयुक्त भीतीने कंपित होऊन, त्याचे स्वागत करून आज्ञाधारकपणा तुम्ही सर्वांनी कसा दर्शविला, ह्याची तो आठवण करतो, म्हणून त्याचे तुमच्याविषयीचे प्रेम वृद्धिंगत होत आहे.


दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करीत आहोत, अशा प्रामाणिक भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत आपल्या जगातील धन्यांचे आज्ञापालन करीत जा.


सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही, तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकात्मतेने शुभवर्तमानावरील विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर आहात.


कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने दुःखही सोसावे अशी संधी तुम्हांला कृपा म्हणून देण्यात आली आहे.


ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभिले, तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे.


तुमच्यासंबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तीमथ्यला मी तुमच्याकडे पाठवावे म्हणून मी प्रभूमध्ये आशा बाळगून आहे.


प्रियजनहो, तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे; तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये स्थिर राहा.


फिलिप्पै येथील ख्रिस्ती लोकांनो, तुम्हांला ठाऊक आहे की, शुभवर्तमानाच्या प्रारंभी, मी मासेदोनियाहून निघालो, तेव्हा तुमच्यावाचून दुसऱ्या कोणत्याही ख्रिस्तमंडळीने माझ्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही.


कारण तुम्ही तुमची श्रद्धा कृतीत कशी उतरवीत आहात, तुमच्या प्रीतीमुळे तुम्ही कसे श्रम करीत आहात आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधील तुमची आशा कशी स्थिर आहे, ह्यांचे आम्ही देवपित्यासमोर निरंतर स्मरण करतो.


निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण शाश्वत गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सहन करतो.


तर मग आपण विश्वास ठेवणाऱ्या साक्षीदारांच्या एवढ्या महान साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व अडथळे व सहज गुंतविणारे पाप सोडून आपल्याला नेमून दिलेल्या शर्यतीत निर्धाराने धावावे.


ज्या विसाव्याविषयी देव बोलला, त्याच्याविषयीचे अभिवचन त्याने आपल्याला देऊन ठेवलेले आहे; कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण काळजी घेऊ या;


म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, ह्यासाठी की, त्यांच्या अविश्वासाच्या उदाहरणाप्रमाणे आपल्यापैकी कोणी अपयशी ठरू नये.


आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगाच्या तारणाचा कर्ता झाला,


प्रियजनहो, जे तुम्ही ह्या जगात परके व निराश्रित आहात, त्या तुम्हांला मी विनंती करतो की, आत्म्याविरुद्ध लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा.


आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन.


Follow us:

Advertisements


Advertisements