Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 2:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 ह्यावरून ख्रिस्तामध्ये काही प्रोत्साहन, प्रीतीचे काही सांत्वन, पवित्र आत्म्याची काही सहभागिता, काही करुणा व सहानुभूती, ही जर आहेत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करूणा ही जर आहेत,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यास्तव ख्रिस्ताच्या ठायी ऐक्यता असल्यामुळे काही उत्तेजन, त्यांच्या प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, जर काही करुणा व कळवळा आहे,

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 2:1
42 Cross References  

त्या समयी शिमोन नावाचा एक मनुष्य यरुशलेममध्ये राहात होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य होता. तो इस्राएलच्या मुक्तीची वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्या सोबत होता.


मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे परत येईन.


मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती तुम्हांला देतो. जसे जग देते तशी मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ देऊ नका.


आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी ह्या गोष्टी जगात बोलत आहे.


ते दररोज मंदिरात एकत्र जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि आनंदी व विनम्र वृत्तीने अन्न खात असत.


विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे, असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामाईक होते.


ही आशा आपली फजिती होऊ देत नाही कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.


तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे, हे आपल्याला ठाऊक नसते. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो.


त्याचप्रमाणे आपण यहुदी असू किंवा ग्रीक असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने अभिषिक्त झालो आहोत.


बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधे मला तुमच्याविषयी जो अभिमान वाटतो त्याला स्मरून मी खरोखर सांगतो की, मी रोज मृत्यू स्वीकारतो!


तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वसती करतो, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?


प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हां सर्वांबरोबर राहो.


परंतु ख्रिस्ताच्या विजययात्रेत बंदिवान म्हणून सहभागी करणाऱ्या आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध पसरविणाऱ्या देवाला आम्ही धन्यवाद देतो!


तुम्ही पुत्र आहात, हे दर्शविण्यासाठी देवाने ‘पित्या, माझ्या पित्या’ अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे.


परंतु आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, चांगुलपणा, औदार्य, विश्वासूपणा,


तुम्हांला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे.


माझ्यामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हां सर्वांसाठी किती उत्कंठित आहे, ह्याविषयी देव माझा साक्षी आहे.


आपण खऱ्या अर्थाने सुंता झालेले, आत्म्याच्या प्रेरणेने देवाची आराधना करणारे, ख्रिस्त येशूमध्ये आनंद मानणारे व बाह्य गोष्टींवर भरवसा न ठेवणारे आहोत.


ते परिश्रम ह्यासाठी की, त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रीतीने एकमेकांना ते जोडले जावेत, ज्ञानाची पूर्ण खातरी ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व देवाच्या, म्हणजे पित्याच्या व ख्रिस्ताच्या रहस्याचे, पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे.


तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणा, चांगुलपणा, लीनता, सौम्यता व सहनशीलता हे सारे धारण करा.


ह्यासाठी की, आपणापुढे ठेवण्यात आलेली आशा प्राप्त करून घेण्याकरिता आपण देवाचा आश्रय घेतला असल्यामुळे आपल्याला ह्या दोन गोष्टींमुळे उत्तेजन मिळावे:अभिवचन आणि शपथ ह्या दोन गोष्टी न बदलणाऱ्या असून त्यांच्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे.


देवपित्याच्या योजनेनुसार तुम्ही निवडलेले आहात. तुम्हांला पवित्र आत्म्याद्वारे पवित्र करण्यात आले आहे ज्यामुळे तुम्ही येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करून त्याच्या रक्ताने शुद्ध व्हावे. तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो.


त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्याबरोबर एकनिष्ठ राहतो व तो त्या माणसामध्ये राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्यामध्ये राहतो.


देवाला कोणी कधीही पाहिले नाही, आपण एकमेकांवर प्रीती करीत असलो, तर आपल्यामध्ये देव राहतो आणि त्याची प्रीती आपल्यामध्ये पूर्णत्व पावली आहे.


देवाची आपल्यावर जी प्रीती आहे, ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे, जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो.


Follow us:

Advertisements


Advertisements