Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 1:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 माझ्यामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हां सर्वांसाठी किती उत्कंठित आहे, ह्याविषयी देव माझा साक्षी आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे ह्याविषयी देव माझा साक्षी आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 देव माझा साक्षी आहे की, मला ख्रिस्त येशूच्या कळवळ्यात सर्वांविषयी किती उत्कंठा लागली आहे,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 ख्रिस्त येशूंच्या ममतेने मी तुम्हासाठी किती उत्कंठित आहे, याविषयी परमेश्वर साक्षी आहे.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 1:8
24 Cross References  

अंधारात व मृत्युच्छायेत बसलेल्यांना त्याने प्रकाश द्यावा आणि आमच्या पायांना शांतीचा मार्ग दाखवावा म्हणून परमेश्वराच्या कोमल करुणेने उद्धाराची पहाट उगवेल.”


मी जे काही सांगत आहे ते खरे आहे, ह्याविषयी देव माझा साक्षीदार आहे. त्याच्या पुत्राचे शुभवर्तमान घोषित करून मी देवाची मनापासून सेवा करीत आहे.


मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझी सदसद्विवेकबुद्धीही पवित्र आत्म्याच्या साहाय्याने माझ्याबरोबर साक्ष देते की,


जेव्हा आम्ही दुर्बळ असतो आणि तुम्ही सबळ असता, तेव्हा आम्हांला आनंद वाटतो व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही आम्ही प्रार्थना करतो.


आमच्या प्रीतीत संकुचितपणा नाही. तुमच्यात मात्र आहे.


आदरयुक्त भीतीने कंपित होऊन, त्याचे स्वागत करून आज्ञाधारकपणा तुम्ही सर्वांनी कसा दर्शविला, ह्याची तो आठवण करतो, म्हणून त्याचे तुमच्याविषयीचे प्रेम वृद्धिंगत होत आहे.


तर पाहा, तुम्हांला मी जे लिहीत आहे, ते खोटे लिहीत नाही, हे मी देवासमक्ष सांगतो.


तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाद्वारे देवाचे पुत्र आहात.


माझ्या मुलांनो, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्यासंबंधी प्रसृतीवेदना होत आहेत.


ह्यावरून ख्रिस्तामध्ये काही प्रोत्साहन, प्रीतीचे काही सांत्वन, पवित्र आत्म्याची काही सहभागिता, काही करुणा व सहानुभूती, ही जर आहेत.


तो आजारी आहे, हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याचे अंत:करण जड झाले व तुम्हांला भेटण्याची त्याला उत्कंठा लागली होती.


प्रियजनहो, तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे; तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये स्थिर राहा.


तुमच्यासाठी, लावदिकीया येथील लोकांसाठी व ज्या इतरांनी मला प्रत्यक्ष पाहिले नाही, त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम करीत आहे, हे तुम्हांला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे.


तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणा, चांगुलपणा, लीनता, सौम्यता व सहनशीलता हे सारे धारण करा.


आम्ही आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो, हे तुम्हांला माहीत आहे. तसेच लोभ झाकण्याकरिता शब्द वापरत नव्हतो. देव आमचा साक्षी आहे!


आम्हांला तुमच्याविषयी जिव्हाळा वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हांला केवळ देवाच्या शुभवर्तमानाचे दानच देण्यास नव्हे, तर तुमच्यावरील आमच्या गाढ प्रीतीमुळे तुमच्याकरिता आपला जीवही देण्यास तयार होतो.


मला प्राणप्रिय असलेल्या त्याला, मी तुझ्याकडे परत पाठविले आहे.


हे बंधो, प्रभूसाठी माझ्यावर एवढा उपकार कर, ख्रिस्तामध्ये माझा बंधू म्हणून मला आनंदित कर!


स्वतःजवळ ऐहिक धन असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून, जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्यामध्ये देवाची प्रीती कशी राहणार?


Follow us:

Advertisements


Advertisements