Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 1:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही, तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकात्मतेने शुभवर्तमानावरील विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर आहात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकजिवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर राहता;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हास भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्याबाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून शुभवर्तमानाच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 पण काहीही झाले, तरी ख्रिस्ताच्या शुभवार्तेला साजेल असे तुमचे आचरण ठेवा, म्हणजे मी तुम्हाला पुन्हा येऊन भेटलो अथवा माझ्या अनुपस्थितीत मला तुमच्याबद्दल असे ऐकावयास यावे की तुम्ही एका आत्म्यात स्थिर आहात व विश्वासाच्या शुभवार्तेमध्ये एकत्र झटत आहात,

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 1:27
53 Cross References  

त्याने त्यांच्या मनातील विचार ओळखून त्यांना म्हटले, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा कुटुंब टिकत नाही.


ते दररोज मंदिरात एकत्र जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि आनंदी व विनम्र वृत्तीने अन्न खात असत.


काही दिवसांनंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी द्रुसिल्‍ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्याकडून ऐकून घेतले.


विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे, असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामाईक होते.


मला शुभवर्तमानाची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी, म्हणजेच प्रथम यहुदी व नंतर यहुदीतर माणसांसाठीदेखील, ते देवाचे तारणदायक सामर्थ्य आहे.


त्याच्याद्वारे मला कृपा व प्रेषितपदही मिळाले, अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे.


मी जे काही सांगत आहे ते खरे आहे, ह्याविषयी देव माझा साक्षीदार आहे. त्याच्या पुत्राचे शुभवर्तमान घोषित करून मी देवाची मनापासून सेवा करीत आहे.


तर ते नीतिमत्व काय म्हणते? ‘देवाचा शद्ब तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे,’ आमच्या विश्वासाचा विषय असलेला तो शद्ब आम्ही जगजाहीर करीत आहोत, तो हाच,


ती संधी अशी की, मी यहुदीतरांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे. देवाचे शुभवर्तमान घोषित करण्यासाठी एखाद्या याजकाप्रमाणे मी सेवा करतो अशासाठी की, यहुदीतरांनी पवित्र आत्म्याने पवित्र होऊन आपणास समर्पित करावे.


जेव्हा मी तुमच्याकडे येईन, तेव्हा ख्रिस्ताच्या आशीर्वादाने भरलेला असा येईन, हे मला ठाऊक आहे.


बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हां सर्वांचे बोलणे ऐक्याचे असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फूट पडू नये. तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले असावे.


म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, स्थिर आणि अढळ राहा. प्रभूच्या कार्यात सतत मग्न राहा; कारण तुम्ही जाणून आहात की, प्रभूमध्ये तुम्ही केलेले श्रम कधीच व्यर्थ ठरणार नाहीत.


बंधुजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण होवो, तुम्हांला पूर्णता लाभो, माझ्या आवाहनांकडे लक्ष द्या. तुम्ही एकचित्त व्हा. शांतीने राहा म्हणजे प्रेमस्वरूप व शांतिदाता देव तुमच्यासोबत राहील.


त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची तंतोतंत प्रतिमा असलेल्या ख्रिस्ताच्या वैभवशाली शुभवर्तमानाचा प्रकाश त्यांच्यावर पडू नये.


ह्या तुमच्या सेवेमधून हे सिद्ध होते की, तुम्ही ख्रिस्ताचे शुभवर्तमान पतकरण्याच्या बाबतीत निष्ठा दाखविल्यामुळे आणि त्यांना व सर्वांना दान देण्याचे औदार्य दाखविल्यामुळे देवाचा गौरव होतो.


खरे म्हणजे दुसरे शुभवर्तमान नाही, पण तुम्हांला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाचा विपर्यास करू पाहणारे असे कित्येक आहेत, म्हणून मी असे म्हणतो.


तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीचे शुभवर्तमान ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने वचन दिलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्यामध्ये ठसा उमटविण्यात आला आहे.


प्रभू येशूमध्ये असलेला तुमचा विश्वास आणि सर्व पवित्र लोकांबद्दल तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्यांविषयी ऐकून,


म्हणून प्रभूमध्ये बंदिवान असा मी तुम्हांला विनंती करून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला.


प्रियजनहो, मी तुमच्याजवळ असता तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात. तर विशेषकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही तुम्ही आज्ञापालन करावे, हे अधिक महत्त्वाचे आहे. आपले तारण पूर्णत्वास नेण्यासाठी भयाने थरकाप होत असतानाही श्रम करीत राहा;


तसेच प्रभूवर माझा भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर तुमच्याकडे येईन.


मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आत्ताही अश्रू ढाळीत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या क्रुसावरील मृत्यूचे वैरी आहेत.


आपले नागरिकत्व मात्र स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा आपला तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत.


प्रियजनहो, तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे; तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये स्थिर राहा.


अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला प्रसन्न करण्याकरता त्याला शोभेल असे वागावे; म्हणजे तुम्ही प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाविषयीच्या पूर्ण ज्ञानात तुमची वृद्धी व्हावी.


कारण आम्ही ख्रिस्त येशूवरील तुमचा विश्वास व सर्व पवित्र लोकांवरील तुमची प्रीती ह्यांविषयी ऐकले आहे.


आता तीमथ्यने तुमची भेट घेतल्यानंतर आमच्याकडे येऊन, तुमचा विश्वास व प्रीती ह्यांविषयी आणि जशी तुम्हांला भेटायची आम्हांला उत्कंठा आहे, तशी तुम्हांलादेखील आम्हांला भेटायची उत्कंठा आहे आणि तुम्ही आमची नेहमी प्रेमाने आठवण करता, ह्याविषयीचे आनंददायक वृत्त आम्हांला कळविले.


बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये विनंती व आवाहन करतो की, तुम्ही कसे वागून देवाला प्रसन्न करून घ्यावे हे तुम्ही आमच्याकडून ऐकून घेतले व तुम्ही खरोखर त्याप्रमाणे वागत आहात, त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी;


धन्यवादित देवाच्या गौरवशाली शुभवर्तमानाला जी साजेशी आहे ती शिकवण आमच्याकडे सोपविण्यात आली आहे.


कित्येकांनी सदसद्विवेकबुद्धी झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले,


मी सुयुद्ध लढलो आहे, शर्यत पूर्ण केली आहे, विश्वास राखला आहे.


त्यांना लुबाडू नये, तर सर्व प्रकारे इमानेइतबारे वागावे, ह्यासाठी की, त्यांनी सर्व गोष्टींत आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणावी, असा त्यांना बोध कर.


आणि शांती निर्माण करणारे शांतीने जे बी पेरतात त्याला नीतिमत्त्वाचे पीक येते.


ही सर्व अशी लयास जाणार आहेत, म्हणून पवित्र व धार्मिक जीवन जगून देवाचा दिवस येण्याची वाट पाहणारे व तो दिवस लवकर यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणारे तुम्ही असावे.


म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे त्याच्याबरोबर शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा.


प्रियजनहो, आपल्या सामाईक तारणाविषयी तुम्हांला लिहिण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत असताना तुम्हांला श्रद्धेच्या लढाईत टिकून राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता लिहिण्याची मला आवश्यकता वाटली. ही श्रद्धा देवाने निर्णायक स्वरूपात पवित्र जनांच्या हवाली केली आहे.


Follow us:

Advertisements


Advertisements