Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 1:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 जेव्हा मी तुमच्याकडे पुन्हा येईन, तेव्हा ख्रिस्त येशूविषयीच्या तुमच्या अभिमानात अधिक परिपूर्णपणे सहभागी होईन.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 हे अशासाठी की, तुमच्याकडे माझे पुन्हा येणे झाल्याने, माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हांला अधिक कारण व्हावे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 हे अशासाठी की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हास अधिक कारण व्हावे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 मी तुम्हाला भेटण्यासाठी पुन्हा परत आलो म्हणजे ख्रिस्त येशूंमधील तुमचा माझ्यासंबंधीचा अभिमान भरून वाहू लागेल.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 1:26
14 Cross References  

ह्याप्रमाणे तुम्हांला आता दुःख झाले तरी मी तुम्हांला पुन्हा पाहीन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमच्याकडून तुमचा आनंद कोणीही हिरावून घेणार नाही.


तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की, तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.


आम्ही तुमच्याजवळ आपली प्रशंसा पुन्हा करत नाही, तर तुम्हांला आमच्याविषयी अभिमान बाळगण्याची पुन्हा संधी मिळावी म्हणून असे लिहितो ज्यामुळे जे चारित्र्याबद्दल नव्हे तर बाह्य गोष्टीबद्दल अभिमान बाळगतात त्यांना तुम्हांला उत्तर देता यावे.


मी त्याच्याजवळ तुमच्याविषयी जो अभिमान बाळगला त्याबाबतीत तुम्ही मला अपमानित होण्याची वेळ आणली नाही, आम्ही तुमच्याबरोबर सर्व गोष्टी सत्याला स्मरून बोललो, त्याप्रमाणे तीतबरोबर बोलताना आम्ही जो अभिमान व्यक्त केला तो खरा ठरला.


मी वारंवार तुमच्याविषयी बढाई मारतो. मला तुमचा फार अभिमान वाटतो. मी तुमच्याविषयी समाधानी आहे. आमच्यावर ओढवलेल्या दु:खात मी अतिशय आनंदित आहे.


तथापि निराश झालेल्यांचे सांत्वन करणारा देव ह्याने तीताच्या आगमनाने आम्हांला आनंदित केले.


प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या वर्तनाचे परीक्षण करावे म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.


शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अगोदर लिहिलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करण्यास मी कंटाळा करीत नाही, परंतु हे तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे.


आपण खऱ्या अर्थाने सुंता झालेले, आत्म्याच्या प्रेरणेने देवाची आराधना करणारे, ख्रिस्त येशूमध्ये आनंद मानणारे व बाह्य गोष्टींवर भरवसा न ठेवणारे आहोत.


मला प्रभूमध्ये जीवनात मोठा आनंद होत आहे. त्यामुळेच आता बऱ्याच काळानंतर तुमची माझ्याविषयीची आपुलकी पुन्हा जागृत झाली. ही आपुलकी संपुष्टात आली होती असे नव्हे, पण तुम्हांला संधी मिळत नव्हती.


प्रभूमध्ये नेहमी आनंद करा, मी पुन्हा सांगतो, आनंद करा.


Follow us:

Advertisements


Advertisements