Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 1:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युतर देण्यास नेमलेला आहे, हे ओळखून काही जण प्रेमाने घोषणा करतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मी सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 दुसरे जे आहेत ते प्रीतीमुळे करतात, कारण शुभवार्तेचे समर्थन करण्यासाठी मी येथे आहे, हे त्यांना ठाऊक आहे.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 1:16
13 Cross References  

हे जर मी स्वेच्छेने करीत असेन, तर मला पारितोषिक मिळेल आणि स्वेच्छेने नसेल, तरी माझ्यावर ही जबाबदारी देवाने सोपवली आहे व माझे कर्तव्य म्हणून मी ती पार पाडीत आहे.


पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर देवाने आम्हांला पाठवले आहे म्हणून प्रामाणिकपणे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताचे सेवक म्हणून बोलणारे आहोत.


जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे


बंधूंनो, माझ्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्या त्या शुभवर्तमानाच्या वृद्धीला कारणीभूत झाल्या, हे तुम्ही समजावे, अशी माझी इच्छा आहे.


तुमच्या अंतःकरणात मला तुम्ही स्थान दिले आहे! म्हणून मला तुमच्याविषयी जे वाटते ते योग्यच आहे. कारण माझ्या तुरुंगवासात व शुभवर्तमानाचे समर्थन करण्यात ते तसेच प्रस्थापित करण्यात तुम्ही माझ्याबरोबर कृपेचे भागीदार आहात.


तीमथ्यचे महत्त्व तुम्हांला माहीत आहे की, जसा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर सेवा करतो तशी आम्ही शुभवर्तमानासाठी एकत्रित सेवा केली आहे.


फिलिप्पै येथील ख्रिस्ती लोकांनो, तुम्हांला ठाऊक आहे की, शुभवर्तमानाच्या प्रारंभी, मी मासेदोनियाहून निघालो, तेव्हा तुमच्यावाचून दुसऱ्या कोणत्याही ख्रिस्तमंडळीने माझ्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही.


तसेच हे माझ्या विश्वासू सहकाऱ्या, मी तुलाही विनंती करतो की, ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत, असे माझे इतर सहकारी ह्यांच्याबरोबर शुभवर्तमानाच्या कामी श्रम केले, त्यांना साहाय्य कर.


Follow us:

Advertisements


Advertisements