Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 1:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही नीतिमत्त्वाच्या फळांनी भरून जावे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने भरून जावे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होणार्‍या नीतिमत्वाच्या फळांनी भरले जावे व त्याद्वारे परमेश्वराची स्तुती आणि गौरव व्हावे.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 1:11
34 Cross References  

त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की, त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.


तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हांला निवडले आहे व तुम्हांला नेमले आहे, म्हणजे तुम्ही जावे. विपुल फळ द्यावे. तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल, ते त्याने तुम्हांला द्यावे.


तो माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येक फाट्याने अधिक फळ द्यावे म्हणून त्याची छाटणी करतो.


तुम्ही विपुल फळ दिले तर माझ्या पित्याचा गौरव होईल. अशा प्रकारे तुम्ही माझे शिष्य व्हाल.


हे काम पूर्ण करून त्यांच्यासाठी जमा केलेला संपूर्ण निधी त्यांच्या पदरात टाकून झाला की, तुमच्याकडील मार्गाने मी स्पेन देशास जाईन.


परंतु आता तुम्ही पापांपासून मुक्त झाल्यामुळे तुम्ही देवाचे गुलाम आहात. ह्याचा फायदा म्हणजे तुम्ही पवित्र होता. त्याची परिणीती शाश्वत जीवनात होते.


तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता, ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.


जो पेरणाऱ्याला बी पुरवतो आणि खायला अन्न पुरवतो, तो तुम्हांला बी पुरवील व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्त्वाचे पीक वाढवील.


सुरुवातीपासून ख्रिस्तावर भिस्त ठेवून असलेले आपण परमेश्वराच्या वैभवाबद्दल त्याची स्तुती करू या.


हा पवित्र आत्मा आपल्या वारशाची हमी आहे व यामुळे आपल्याला खातरी बाळगता येते की, परमेश्वर त्याच्या स्वकीयांना खंडणी भरून मिळविलेली मुक्ती प्रदान करील. आपण त्याच्या वैभवाची स्तुती करू या!


आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूमध्ये आपली निर्मिती करण्यात आली आहे. आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये करीत आपण आपले जीवन जगावे म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली आहेत.


कारण ज्ञानाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नैतिकता व सत्यता ह्यांत दिसून येते.


मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या खात्यात तुमची जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो.


अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला प्रसन्न करण्याकरता त्याला शोभेल असे वागावे; म्हणजे तुम्ही प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाविषयीच्या पूर्ण ज्ञानात तुमची वृद्धी व्हावी.


तुम्ही हे शुभवर्तमान ऐकले व खरेपणाने त्या दिवसापासून जसे तुमच्यामध्ये तसेच सर्व जगातही हे शुभवर्तमान फळ देत आहे व पसरत चालले आहे. तुम्ही देवाची कृपा सत्यस्वरूपात जाणून घेतली आहे.


अशा प्रकारे आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपल्या प्रभू येशूच्या नावाला तुमच्यामध्ये व तुम्हांला त्याच्यामध्ये गौरव मिळेल.


आपल्या लोकांनी आपल्या निकडीच्या गरजा पुरविल्या जाव्यात म्हणून चांगली कृत्येही करण्यास शिकावे, म्हणजे ते निष्फळ ठरणार नाहीत.


कोणतीही शिक्षा त्यावेळी खेदाची वाटते, आनंदाची वाटत नाही; परंतु ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते.


यहुदीतर लोकांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून त्याच्या आगमनाच्या दिवशी देवाचा गौरव करावा.


तुम्हीही स्वतः सजीव दगडासारखे आध्यात्मिक मंदिर म्हणून रचले जात आहात, ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताद्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजेशाही याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही जाहीर करावेत.


ख्रिस्ताच्या नावाकरिता तुमचा अपमान होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवशाली आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन विसावला आहे.


Follow us:

Advertisements


Advertisements