Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 1:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 असे की, जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे; तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 कारण जे उत्तम आहे ते तुम्हाला ओळखता यावे व ख्रिस्ताच्या दिवसासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे,

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 1:10
43 Cross References  

परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा, तू मला अडखळण होतोस. तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्याचा आहे.”


पेत्राने त्याला उत्तर दिले, “जरी सगळे आपल्याला सोडून गेले, तरी मी आपल्याला कधीच सोडणार नाही.”


नथनेलला आपल्याकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खरा इस्राएली आहे, ह्याच्या मनात कपट नाही!”


जो कोणी वाईट कृत्ये करतो, तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.


ह्यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझी सद्सद्विवेकबुद्धी सतत शुद्ध राखण्याचा मी प्रयत्न करत असतो.


देवाची इच्छा काय आहे म्हणजेच त्याच्या दृष्टीने चांगले, ग्रहणीय व परिपूर्ण काय आहे, हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नूतनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.


प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाइटाचा वीट माना, चांगुलपणाला चिकटून राहा.


आता बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हांला शिक्षण मिळाले आहे, त्याविरुद्ध जे फूट पाडतात व अडथळे आणतात त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर राहा;


तुला त्याची इच्छा कळते आणि नियमशास्त्रातले शिक्षण मिळाल्यामुळे जे सर्वोत्तम ते तू पसंत करतोस


जे मी इच्छीत नाही, ते जर मी करतो तर नियमशास्त्र चांगले आहे, हे मी मान्य करतो.


माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो.


देहाचा ध्यास म्हणजे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येणार नाही.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून तोच तुम्हांला शेवटपर्यत दृढ राखील.


यहुदी, ग्रीक व देवाची ख्रिस्तमंडळी ह्यांच्यापैकी कोणाच्याही मनात संदेह निर्माण करणारे होऊ नका,


म्हणून अन्नामुळे माझा बंधू पापात पडत असेल, तर तो पापात पडू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही.


खरे तर आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या औदार्याने व प्रामाणिकपणाने वागलो.


पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर देवाने आम्हांला पाठवले आहे म्हणून प्रामाणिकपणे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताचे सेवक म्हणून बोलणारे आहोत.


आम्ही करत असलेल्या सेवाकार्यात काही दोष दिसून येऊ नयेत म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे दुसऱ्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करत नाही.


मी तुमच्याकरिता आदेश देत नाही, तर दुसऱ्यांच्या कळकळीच्या तुलनेत तुमच्या प्रीतीचा खरेपणा तपासून पाहण्यासाठी मी हे सांगत आहे.


बंधुजनहो, मी अजून सुंतेविषयी प्रबोधन करत असलो, तर अद्याप माझा छळ का होत आहे? तसे असते तर क्रुसाविषयीच्या शिकवणीचा कुणाला अडथळा वाटला नसता.


तर आपण प्रीतीने सत्याला धरून, मस्तक असा जो ख्रिस्त, त्याच्यामध्ये सर्व प्रकारे वाढावे.


प्रभू कशामूळे संतुष्ट होतो, हे समजून घ्या.


म्हणजे त्याने तिला सर्व वैभवासह स्वत:ला सादर करावे. म्हणजेच ती शुद्ध व निर्दोष असावी; तिला सुरकुती किंवा इतर काही कलंक नसावा.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे अमर प्रीती करतात, त्या सर्वांवर देवाची कृपा राहो.


मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युतर देण्यास नेमलेला आहे, हे ओळखून काही जण प्रेमाने घोषणा करतात.


ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभिले, तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे.


असे झाले, तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत, असा अभिमान बाळगण्यास मला ख्रिस्ताच्या दिवशी कारण मिळेल.


अशा प्रकारे आपला प्रभू येशू त्याच्या सर्व पवित्र लोकांसह येईल त्या वेळेस त्याने तुम्हांला देव आपला पिता ह्याच्यापुढे पवित्रतेत परिपूर्ण होण्यासाठी सशक्त करावे.


सर्व गोष्टींची पारख करा. चांगले ते घट्ट धरून ठेवा.


शांतिदाता देव स्वतः तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही संपूर्णपणे निर्दोष राखो.


प्रियजनहो, “मला पवित्र आत्मा मिळाला आहे”, असे म्हणणाऱ्या सर्व माणसांवर विश्वास ठेऊ नका, तर त्यांना मिळालेला आत्मा देवाकडून मिळालेला आहे किंवा नाही ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात वावरत आहेत.


तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर हे सारे मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची पारख केल्यामुळे ते खोटे आहेत, असे तुला दिसून आले.


Follow us:

Advertisements


Advertisements