2 थेस्सल 2:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तुम्ही एकदम मनात गोंधळून जाऊ नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे, अशा विचाराने चिंताग्रस्त होऊ नका. कदाचित आमच्याकडून आलेल्या भविष्यवाणीतून, प्रबोधनातून किंवा पत्रातून आम्हीच असे म्हटले, असा विचार केला जात असावा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका व घाबरू नका; ख्रिस्ताचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणार्या आत्म्याने, किंवा जणू काय आमच्याकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तुम्ही एकदम दचकून भांबावून जाऊ नका व घाबरू नका; प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका; See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आमच्याद्वारे दिलेल्या तथाकथित शिक्षणाद्वारे तुम्ही सहज अस्थिर किंवा गोंधळून जाऊ नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे, असे ठामपणे आपल्या संदेशाद्वारे किंवा बोलण्याद्वारे किंवा पत्राद्वारे सांगणार्यांना घाबरून जाऊ नका. See the chapter |