Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 4:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मला प्रभूमध्ये फार आनंद झाला. आता तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हास संधी नव्हती.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मला प्रभूच्या ठायी मोठा आनंद झाला की, आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली; ही काळजी तुम्ही करीतच होता; पण तुम्हांला संधी नव्हती.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 मला प्रभूमध्ये जीवनात मोठा आनंद होत आहे. त्यामुळेच आता बऱ्याच काळानंतर तुमची माझ्याविषयीची आपुलकी पुन्हा जागृत झाली. ही आपुलकी संपुष्टात आली होती असे नव्हे, पण तुम्हांला संधी मिळत नव्हती.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मी प्रभूमध्ये स्तुती करतो की शेवटी तुम्हाला माझ्याविषयीची पुन्हा काळजी उत्पन्न झाली. तुम्ही खरोखर काळजी करीत होता हे मला माहीत आहे, पण ते तुम्हाला प्रकट करण्याची संधी मिळाली नाही.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 4:10
11 Cross References  

राजा हिज्कीया आणि इतर सरदार यांनी जेव्हा या राशी पाहिल्या तेव्हा त्यांनी परमेश्वरास आणि इस्राएलाच्या प्रजेला धन्यवाद दिले.


तुझ्या लोकांनी तुझ्याठायी आनंद करावा, म्हणून तू आम्हास परत जिवंत करणार नाहीस का?


त्याच्या सावलीत राहणारे लोक परत येतील, ते धान्यासारखे पुनर्जिवित होतील; आणि द्राक्षाप्रमाणे फळ देतील, त्याची प्रतिष्ठा लबानोनाच्या द्राक्षरसासारखी होईल.


आणि मी तुम्हाजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही कारण मासेदोनियाहून जे बंधू आले त्यांनी माझी गरज पुरविली आणि सर्व गोष्टीत मी तुम्हास ओझे होऊ नये म्हणून मी स्वतःस ठेवले आणि यापुढेही ठेवीन.


खरेपणाच्या वचनाने व देवाच्या सामर्थ्याने, उजव्या हातात व डाव्या हातात नीतिमत्त्वाची शस्त्रे बाळगून,


म्हणून आपल्याला संधी असेल तसे आपण सर्वांचे बरे करावे व विशेषतः विश्वासाने एका घराण्यात एकत्र आलेल्या विश्वास ठेवणाऱ्यांचे बरे करावे.


ज्याला वचनाचे शिक्षण मिळते त्याने शिक्षण देणार्‍याला सर्व प्रकारच्या चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा.


पौल व तीमथ्य, ख्रिस्त येशूचे दास ह्यांच्याकडून; फिलिपै शहरातील ख्रिस्त येशूमध्ये जे पवित्र आहेत, त्या सर्वांना आणि त्यांच्याबरोबर अध्यक्ष व सेवक ह्यास सलाम;


मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो.


कारण माझी सेवा करण्यांत तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.


Follow us:

Advertisements


Advertisements