Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 2:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तर स्वतःला रिकामे केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 उलट, त्यांनी स्वतःला रिक्त केले आणि दासाचे स्वरूप घेऊन, मनुष्यांच्या प्रतिरूपाचे झाले.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 2:7
31 Cross References  

परंतू मी किटक आहे, मी मनुष्य नाही, जो मनुष्यांनी निंदिलेला आणि लोकांनी तिरस्कार केलेला आहे.


पाहा, माझा सेवक, ज्याला मी उचलून धरतो; माझा निवडलेला, याच्या विषयी माझा जीव आनंदीत आहेः मी आपला आत्मा त्याच्याठायी ठेवीन; तो राष्ट्रावर न्याय आणील.


तो मला म्हणाला, “तू माझा सेवक इस्राएल आहेस, ज्याच्या ठायी मी माझा महिमा प्रकट करीन.”


तो आपल्या जिवाच्या दुःखसहनानंतर, तो पाहील व त्याच्या आपल्या ज्ञानाने समाधानी होईल. माझा आपला नितीमान सेवक पुष्कळांचा न्याय करील; तो त्यांच्या अन्यायाचा भार आपल्यावर घेईल.


बासष्ट आठवड्यानंतर अभिषिक्ताचा वध करण्यात येईल व त्याकडे काही उरणार नाही जो येणारा अधिपती त्याचे सैन्य शहर आणि वेदी यांचा नाश करतील, त्याचा नाश पुराने होईल युध्द शेवटपर्यंत होईल सर्व काही उजाड होण्याची घोषणा झाली आहे.


तेव्हा हे यहोशवा मुख्य याजका, तू स्वत: व तुझ्यासमोर राहणाऱ्या सहकारी याजकांनो ऐका! ही माणसे तर चिन्ह अशी आहेत, मी माझ्या सेवकाला आणतो, त्यास फांदी असे म्हणतील.


हे सियोनकन्ये, आनंदोत्सव कर! यरूशलेम कन्यांनो, आनंदाने जल्लोश करा! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे नीतिमत्त्वाने येत आहे; आणि तो तारण घेवून येत आहे. तो विनम्र आहे आणि एका गाढवीवर, गाढवीच्या शिंगरावर तो स्वार झाला आहे.


“हा माझा सेवक, याला मी निवडले आहे. मी त्याजवर प्रीती करतो आणि त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट वाटतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन, आणि तो परराष्ट्रीय लोकांस योग्य न्यायाची घोषणा करील.


म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे. जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”


तो त्यांना म्हणाला, “होय, एलीया पहिल्याने येऊन सर्वकाही व्यवस्थितपणे करतो हे खरे आहे. परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दुःखे सोसावीत व नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे?


तेव्हा मोठा कोण जो मेजावर बसतो तो की जो सेवा करतो तो? जो मेजावर बसतो तो नाही का? परंतु मी तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे.


शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते.


ती सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे, जो देहासंबंधाने दाविदाच्या वंशात जन्मास आला.


कारण ख्रिस्तानेही स्वतःला संतुष्ट केले नाही, पण ‘तुझी निंदा करणार्‍यांची सर्व निंदा माझ्यावर आली’ हे नियमशास्त्रात लिहिले आहे तसे होऊ दिले.


कारण मी म्हणतो की, ख्रिस्त देवाच्या सत्याकरता सुंता झालेल्यांचा सेवक झाला; म्हणजे पूर्वजांना दिलेल्या त्याच्या वचनांचे त्याने त्यांना प्रमाण द्यावे,


कारण देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्यास जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापासाठी पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली.


कारण जरी अशक्तपणात तो वधस्तंभावर खिळला गेला तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत आहे कारण त्याच्यात आम्हीही दुर्बळ आहोत पण आम्ही देवाच्या सामर्थ्याने तुमच्यासाठी जिवंत राहू.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हास माहीत आहे, तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.


पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला,


तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही,


जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.


तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत त्यांची आठवण करा. तुम्हीही शरीरात असल्याने जे दुःख भोगीत आहेत त्यांची आठवण ठेवा.


कारण आपल्याला लाभलेला महायाजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूती दर्शवण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे पापविरहीत राहिला.


Follow us:

Advertisements


Advertisements