Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 2:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 ह्यावरून पूर्ण आनंदाने तुम्ही त्याचे प्रभूमध्ये स्वागत करा. अशांचा मान राखा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 ह्यावरून प्रभूच्या ठायी त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा; आणि अशांचा मान राखा;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 त्याचे स्वागत प्रभूला स्मरून पूर्ण आनंदाने करा आणि त्याच्यासारख्या सर्वांचा सन्मान करा.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 प्रभूमध्ये मोठ्या आनंदाने त्याचे स्वागत करून त्याच्यासारख्यांचा सत्कार करा.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 2:29
21 Cross References  

“शांती प्रस्थापित झाली आहे चांगुलपणा आला आहे. तारण झाले आहे. सियोन, तुमचा देव हाच राजा आहे.” अशी जो घोषणा करतो, त्याचे पाय पर्वतांवर किती सुंदर आहेत.


जितके तुम्हास अंगीकारीत नाहीत तितक्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या नगरातून निघते वेळी आपल्या पायांची धूळ झाडून टाका.”


मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्यास स्वीकारतो.”


ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत;


त्यांनी आम्हास सन्मानपूर्वक पुष्कळ वस्तू भेटीदाखल दिल्या आणि जेव्हा आम्ही परत प्रवासास निघालो तेव्हा आम्हास लागणाऱ्या अनेक गोष्टी पुरविल्या.


यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले.


आणि त्यांना पाठविल्याशिवाय ते कशी घोषणा करतील? कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘जे चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगतात त्यांचे पाय किती सुंदर आहेत!’


तुम्ही पवित्र जनांस शोभेल असे तिचे प्रभूमध्ये स्वागत करा आणि तिच्या ज्या कामात तुमची गरज लागेल त्यामध्ये तिचे साहाय्यक व्हा; कारण ती स्वतः पुष्कळांना व मलाही साहाय्यक झाली आहे.


जर तीमथ्य आला तर तो तुमच्याजवळ निर्भयपणे कसा राहील याकडे लक्ष द्या कारण तोसुध्दा माझ्यासारखेच प्रभूचे कार्य करीत आहे.


कारण त्यांनी माझा व तुमचा आत्मा प्रफुल्लीत केला आहे. अशा लोकांस मान्यता द्या.


कारण स्वतःची प्रशंसा करणारा स्वीकृत नाही पण प्रभू ज्याची प्रशंसा करतो तोच स्वीकृत आहे.


तुम्ही आमचा अंगिकार करा; आम्ही कोणावर अन्याय केला नाही, कोणाला बिघडवले नाही, कोणाचा गैरफायदा घेतला नाही.


म्हणून, मी त्यास पाठविण्याची अधिक घाई केली, म्हणजे त्यास पुन्हा भेटून तुम्ही आनंद करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले.


माझा सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हास सलाम सांगतो, तसाच बर्णबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हास सलाम सांगतो. (त्याच्याविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत. तो जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याचा स्वीकार करा.)


आणि बंधूंनो, आम्ही तुम्हास विनंती करतो की, जे तुमच्यांत परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यांवर आहेत आणि तुम्हास बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या;


जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे.


आपल्या अधीकाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशोब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दुःखाने न करता आनंदाने करावे.


या कारणामुळे जेव्हा मी येतो तेव्हा तो जो करीत आहे ते दाखवून देईन. तो वाईट शब्दांनी खोटेपणाने माझ्याविरुद्ध बोलत आहे व एवढ्यावरच तो समाधान मानीत नाही, तर त्यामध्ये भर म्हणून बंधूंचा तो स्वीकार करत नाहीच उलट मंडळीतील जे लोक त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांना अडथळा करतो आणि त्यांना मंडळीबाहेर घालवितो!


Follow us:

Advertisements


Advertisements