Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 2:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तरी मला माझा बंधू आणि सहकारी व सहसैनिक आणि तुमचा प्रेषित आणि माझी गरज भागवून माझी सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठविण्याचे आवश्यक वाटले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तथापि माझा बंधू, सहकारी व सहसैनिक, आणि तुमचा जासूद व माझी गरज भागवून सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठवण्याचे अगत्य वाटले;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 माझा बंधू, सहकारी व सहसैनिक, आणि तुमचा निरोप्या तसेच माझ्या गरजेत माझा सेवक एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठविणे मला आवश्यक वाटले;

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 मध्यंतरी मला वाटले की मी एपफ्रदीत हा माझा भाऊ, सहकारी, सहसैनिक आणि तुमचा संदेशवाहक याला तुमच्याकडे परत पाठवावे. माझ्या गरजेच्यावेळी मला साहाय्य करण्यासाठी तुम्ही त्याला पाठविले होते.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 2:25
19 Cross References  

कापणीच्या समयी जसे बर्फाचे पेय, तसा विश्वासू दूत त्यास पाठवणाऱ्याला आहे कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करतो.


मी तुम्हास खरे खरे सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नाही; आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा मोठा नाही.


जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आहे.


ख्रिस्त येशूमध्ये माझे जोडीदार-कामकरी प्रिस्का व अक्विला ह्यांना सलाम द्या.


ख्रिस्तात आमचा जोडीदार-कामकरी उर्बान आणि माझा प्रिय स्ताखू ह्यांना सलाम द्या.


कारण अपुल्लोस आणि मी देवाच्या सेवाकार्यात सहकर्मी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात.


माझा बंधू तीत हा मला सापडला नाही म्हणून माझ्या जीवाला चैन पडेना. मग तेथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियास निघून गेलो.


कारण तो आजारी आहे हे तुम्ही ऐकले होते असे त्यास समजल्यावर त्यास तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत अस्वस्थ झाला होता;


पण माझ्याजवळ सर्वकाही आहे आणि विपुल आहे आणि एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे.


आणि हे माझ्या खऱ्या सोबत्या पण मी तुलाही विनवितो की, तू या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर शुभवर्तमानाच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर.


आणि या कृपेविषयीही तुम्ही एपफ्रासकडून शिकलात; तो आमचा प्रिय जोडीदार-कामकरी आणि आमच्या वतीने तुमच्यात असलेला ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे.


युस्त म्हणलेला येशू हाही तुम्हास सलाम सांगतो; सुंता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्यासाठी माझे सहकारी आहेत आणि त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे.


आणि आम्ही आपला बंधू तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हास स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वाढीविषयी उपदेश करावा;


आणि तसेच माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला नमस्कार सांगतात.


म्हणून पवित्र बंधूनो, जे आपण स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहोत, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित आणि आमच्या विश्वासाचा महायाजक आहे.


Follow us:

Advertisements


Advertisements