Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 2:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 प्रभू येशूमध्ये मी आशा करतो की, लवकरच मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवेन म्हणजे, तुम्हा विषयीच्या गोष्टी जाणून माझे समाधान होईल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तुमच्यासंबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तीमथ्याला मी तुमच्याकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 तुमच्यासंबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तीमथ्यला मी तुमच्याकडे पाठवावे म्हणून मी प्रभूमध्ये आशा बाळगून आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 मला प्रभू येशूंमध्ये आशा आहे की, मी लवकरच तीमथ्याला तुमच्याकडे पाठवेन; म्हणजे तुमची बातमी ऐकून मीही उल्हासित होईन.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 2:19
22 Cross References  

परमेश्वर असे म्हणतो, “जो मानवजातीवर विश्वास ठेवतो, जो आपल्या देहाला आपले सामर्थ्य करतो पण त्याचे हृदय परमेश्वरापासून दूर आहे, तो शापित असो.


परराष्ट्रीय लोक त्याच्यावर आशा ठेवतील. येशूचे सामर्थ्य देवाकडून आहे.”


मग तो दर्बे व लुस्र येथे खाली आला; आणि पाहा, तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता; तो विश्वास ठेवणाऱ्या कोणाएका यहूदी स्त्रीचा मुलगा होता, त्याचा पिता हेल्लेणी होता.


आणि पुन्हा, यशया म्हणतो की, ‘इशायाला अंकुर फुटेल, आणि जो परराष्ट्रीयांवर अधिकार करण्यास उभा राहील; त्याच्यावर परराष्ट्रे आशा ठेवतील.’


माझा जोडीदार-कामकरी तीमथ्य आणि माझे आप्त लुकियस, यासोन व सोसिपेतर हे तुम्हास सलाम पाठवतात.


यासाठीच तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे. प्रभूमध्ये तो माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. ज्याप्रमाणे मी सगळीकडे प्रत्येक मंडळीमध्ये शिकवतो, तसेच तो ख्रिस्तामधील माझ्या शिकवणुकीची आठवण करून देईल.


ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुद्धा खऱ्या वचनाची आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे.


पौल व तीमथ्य, ख्रिस्त येशूचे दास ह्यांच्याकडून; फिलिपै शहरातील ख्रिस्त येशूमध्ये जे पवित्र आहेत, त्या सर्वांना आणि त्यांच्याबरोबर अध्यक्ष व सेवक ह्यास सलाम;


आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.


म्हणून, मी त्यास पाठविण्याची अधिक घाई केली, म्हणजे त्यास पुन्हा भेटून तुम्ही आनंद करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले.


आणि आम्ही आपला बंधू तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हास स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वाढीविषयी उपदेश करावा;


ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्याचे पाठवले; कोण जाणे, कदाचित परीक्षकाने तुम्हास मोह घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.


बंधूनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकांची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे;


आणि या कारणामुळे मीसुद्धा दुःख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्यास मी ओळखतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपवले आहे त्याचे तो रक्षण करील.


त्याबद्दल तुम्ही असे म्हणा की, “परमेश्वराची इच्छा असल्यास आपण जिवंत असू आणि हे करू किंवा ते करू.”


आणि त्याच्याद्वारे तुम्ही देवावर विश्वास ठेवला; कारण देवावर तुमचा विश्वास व तुमची आशा असावी म्हणून त्यास मृतांतून उठवून गौरव दिला.


Follow us:

Advertisements


Advertisements