Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 1:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 ह्यापासून काय झाले? निमित्ताने असो किंवा खरेपणाने, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच, ह्यात मी आनंद करतो व करणारच.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ह्यापासून काय होते? निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते; आणि ह्यात मी आनंद करतो व करणारच.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 मला काही फरक पडत नाही. अयोग्य हेतूने असो किंवा योग्य हेतूने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते, ह्यात मी आनंद मानतो व मानत राहीन;

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 परंतु यापासून काय होते? त्यांचे हेतू खरे असो किंवा खोटे असो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रकारे ख्रिस्ताचा प्रचार होत आहे आणि त्यातच मी आनंद करणार. होय, त्यातच मी आनंद करीत राहीन.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 1:18
13 Cross References  

अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्हास हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी बंद करता, तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच, पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत.


ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि धार्मिकता दाखविण्यासाठी ते लांब लांब प्रार्थना करतात. या लोकांस फार कडक शिक्षा होईल.”


परंतु हे बोलणे त्यांना समजले नाही व त्यांना ते समजू नये म्हणून ते त्यांच्यापासून गुप्त राखलेले होते; आणि ते या बोलण्याविषयी त्यास विचारायला भीत होते.


तेव्हा येशूने त्यास म्हटले, “मना करू नका, कारण जो तुम्हास प्रतिकूल नाही तो तुम्हास अनुकूल आहे.”


मग काय? आपण यहूदी अधिक चांगले आहोत काय? मुळीच नाही, कारण सगळे यहूदी व ग्रीक पापाखाली आहेत, असा आधीच आम्ही त्यांच्यावर आरोप केला आहे.


मग काय? मग आपण नियमशास्त्राखाली नसून कृपेखाली आणले गेलो आहोत, म्हणून आपण पाप करावे काय? कधीच नाही.


तर मी काय म्हणतो? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की मूर्तीला वाहिलेले अन्न काहीतरी आहे किंवा ती मूर्ती काहीतरी आहे?


मग काय केले पाहिजे? मी माझ्या आत्म्याने प्रार्थना करीन पण त्याचप्रमाणे मी माझ्या बुद्धीनेही प्रार्थना करीन.


म्हणून मी असो किंवा ते असोत आम्ही अशी घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला.


कारण मी जाणतो की हे, तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल.


Follow us:

Advertisements


Advertisements