गणना 5:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जर असे झाले, तर त्या मनुष्याने आपल्या पत्नीला याजकाकडे घेऊन जावे. तसेच त्याने अर्पण म्हणून एक दशमांश एफा जवाचे पीठ अर्पावे; त्याच्यावर त्याने तेल ओतू नये किंवा धूप ठेवू नये; कारण परप्रेमशंकेमुळे केलेले म्हणजे अनीतीचे स्मरण करून देणारे हे अन्नार्पण होय. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तर त्या पुरुषाने आपल्या स्त्रीला याजकाकडे आणावे आणि तिच्यासाठी अर्पण म्हणून एक दशमांश एफा जवाचे पीठ अर्पावे; त्याने त्याच्यावर तेल घालू नये आणि धूप ठेवू नये, कारण परप्रेमशंकेमुळे केलेले म्हणजे अनीतीचे स्मरण करून देणारे हे अन्नार्पण होय. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तर त्याने आपल्या पत्नीला याजकाकडे न्यावे. त्याने तिच्या वतीने सोबत एक एफाचा दहावा भाग जवाचे पीठ आणावे. त्याने त्यावर जैतुनाचे तेल ओतू नये किंवा त्यावर धूप ठेवू नये, कारण हे मत्सरासाठी केलेले अन्नार्पण आहे, अपराधाची आठवण देणारे स्मरणाचे अर्पण आहे. See the chapter |