गणना 4:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तसेच सभोंवतीच्या अंगणाचे खांब, उथळ्या, तंबूच्या मेखा, तणावे आणि अंगणाच्या खांबासाठी लागणारी इतर उपकरणे, इत्यादी सर्वसामान वाहून नेण्याचे व निगा राखण्याचे काम मरारी लोकांचे आहे. त्या मनुष्यांच्या नावांची यादी करा व प्रत्येकाने नक्की काय वाहून न्यायचे ते त्यास सांगा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 आणि सभोवती असलेल्या अंगणाचे खांब, त्यांच्या उथळ्या, मेखा, तणावे आणि त्याच्या सेवेला लागणारी इतर सर्व उपकरणे त्यांनी वाहून न्यावी व त्यांची निगा राखावी; हे जे सगळे सामान त्यांना वाहून न्यायचे त्यातील हरएक वस्तू तपशीलवार त्यांच्या स्वाधीन करावी. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 त्याचप्रमाणे सभोवतालच्या अंगणाचे खांब, त्यांच्या बैठका, मेखा, दोर्या, त्याची सर्व उपकरणे आणि त्याच्या वापरासंबंधीचे सर्व साहित्य न्यावे. ज्या पुरुषाने जी ठराविक वस्तू वाहून न्यावयाची आहे ती त्याला नेमून द्यावी. See the chapter |