मीखाह 4:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पुष्कळ देश त्याच्याकडे जातील व म्हणतील, “या, आपण परमेश्वराच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या घराकडे जाऊ या. मग तो त्याचे मार्ग आपल्याला शिकवील, आणि आपण त्याच्या मार्गांचे अनुसरण करू.” कारण सियोनमधून नियमशास्त्र आणि यरूशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 देशोदेशींच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील, “चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हांला आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या वाटांनी चालू.” कारण सीयोनेतून शिक्षण व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 अनेक राष्ट्रे येतील आणि म्हणतील, “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” कारण सीयोनमधून नियमशास्त्र, यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल. See the chapter |