यिर्मया 44:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळायला व तिच्यासाठी पेयार्पणे ओतायला जे नवस केले आहेत ते खचित फेडू असे तुम्ही आणि तुमच्या स्त्रिया तुम्ही दोघांनी आपल्या मुखाने बोलून आणि आपल्या हातांनी पूर्ण केले आहे. तर तुम्ही आपले नवस खचित स्थापित करा आणि आपले नवस फेडा.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तुम्ही व तुमच्या स्त्रियांनी आपल्या तोंडांनी ते बोलून हातांनी सिद्धीसही नेले आहे. तुम्ही म्हणालात, ‘आकाशराणीस धूप जाळण्याचे व तिला पेयार्पणे अर्पण करण्याचे आम्ही केलेले नवस फेडूच,’ तर तुम्ही आपले नवस कराच व फेडाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही आणि तुमच्या स्त्रियांनी म्हटले, ‘आम्ही निश्चितच आकाशराणीस धूप जाळू व तिला पेयार्पणे करू.’ “तर मग करा, तिला दिलेली वचने पूर्ण करा! तुमचे संकल्पही पूर्ण करा! See the chapter |