यिर्मया 35:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 म्हणून परमेश्वर, सैन्यांचा देव आणि इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “पाहा, जे सर्व अरिष्ट मी त्यांच्याविरुद्ध आणणार म्हणून मी म्हणालो आहे, ते सर्व मी यहूदावर आणि यरूशलेमेच्या राहणाऱ्यांवर आणीन, कारण मी त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी ऐकण्याचे नाकारले. मी त्यांना हाका मारल्या पण त्यांनी उत्तर दिले नाही.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ह्यास्तव परमेश्वर सेनाधीश देव, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी यहूदा व सर्व यरुशलेमकर ह्यांच्यावर जे सर्व अरिष्ट आणीन म्हणून बोललो ते आणीन; कारण मी त्यांच्याबरोबर बोललो असता त्यांनी ते ऐकले नाही, मी त्यांना हाक मारली असता त्यांनी उत्तर दिले नाही.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘ऐका! मी यहूदीयावर व यरुशलेमवर जी अरिष्टे आणण्याची घोषणा केली होती ती अरिष्टे आणेन. मी त्यांच्याशी बोललो, पण ते ऐकत नाहीत; मी हाक मारतो, तेव्हा ते उत्तर देत नाहीत.’ ” See the chapter |