यिर्मया 35:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 इस्राएल आणि यहूदा येथील लोकांकडे मी माझे सर्व सेवक, संदेष्टे पाठविले. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगण्यास पाठविले, प्रत्येक जण आपल्या दुष्ट मार्गापासून वळा आणि चांगली कृत्ये करा. दुसऱ्या देवांना अनुसरू नका आणि त्यांची पूजा करु नका. त्याऐवजी, तुमच्या पूर्वजांना व तुम्हास जो देश दिला आहे त्यामध्ये परत माघारी या. पण या लोकांनी माझे ऐकले नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मी आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना मोठ्या निकडीने तुमच्याकडे पाठवून सांगत आलो की, ‘आता तुम्ही प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून वळा, आपले वर्तन सुधारा, अन्य देवांची सेवा करण्यासाठी त्यांच्यामागे लागू नका; म्हणजे जो देश मी तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिला आहे त्यात तुमची वस्ती होईल.’ पण तुम्ही कान दिला नाही, माझे ऐकले नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 पुन्हापुन्हा मी तुमच्याकडे माझे सेवक संदेष्टे पाठविले. ते म्हणाले, “तुम्हा प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून मागे वळावे व आपल्या आचरणात सुधारणा करावी; इतर दैवतांची सेवा करणे सोडून द्यावे. तर मी जो देश तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिला होता, त्या देशात तुम्ही सुखरुपपणे राहाल.” परंतु तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही वा माझे ऐकले नाही. See the chapter |