यिर्मया 23:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी त्या संदेष्ट्यांविरूद्ध जे फसवे स्वप्ने सांगतात, म्हणजे ते त्यांच्या खोट्या बोलण्याने व बढाईने माझ्या लोकांस चुकीच्या मार्गांने नेतात. कारण लोकांस शिकविण्यासाठी मी त्यांना पाठविलेले नाही. मी त्यांना माझ्यासाठी काही करण्याची आज्ञा कधीही दिलेली नाही. ते या लोकांस खचित मदत करु शकत नाहीत.” परमेश्वर असे म्हणतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 परमेश्वर म्हणतो, पाहा, जे संदेष्टे खोटी स्वप्ने संदेश म्हणून सांगतात त्यांच्याविरुद्ध मी आहे; ते माझ्या लोकांना आपल्या लबाडीने व आपल्या अमर्याद भाषणाने बहकवतात; मी तर त्यांना पाठवले नाही व आज्ञापिलेही नाही; ते ह्या लोकांचे बिलकूल हित करीत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 जे खोटी स्वप्ने सांगून भविष्यवाणी करतात, अशा संदेष्ट्यांच्या मी निश्चितच विरुद्ध उभा आहे, असे याहवेह जाहीर करतात. ते त्यांना वाचाळपणाने लबाडपणे सांगतात आणि माझ्या लोकांना पापाकडे नेतात. याहवेह म्हणतात, “मी त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना निवडले नाही. या लोकांच्या भल्यासाठी यांचा काहीही उपयोग नाही,” असे याहवेह जाहीर करतात. See the chapter |