यशायाह 2:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 “चला, आपण वर परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ, याकोबाच्या देवाच्या मंदिरात जाऊ, म्हणजे तो आम्हास त्याचे मार्ग शिकवील व आपण त्याच्या मार्गात चालू” असे पुष्कळ लोक म्हणतील. कारण सियोनेतून धर्मशास्त्र व यरूशलेमेतून देवाचे वचन बाहेर येईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, “चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हांला आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” कारण सीयोनेतून नियमशास्त्र व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 अनेक लोक येतील आणि म्हणतील, “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” कारण सीयोनमधून नियमशास्त्र, यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल. See the chapter |