अनुवाद 8:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तसेच गेली चाळीस वर्षे आपल्या परमेश्वर देवाने तुम्हास रानावनातून कसे चालवले, त्या प्रवासाची आठवण ठेवा. परमेश्वर तुमची परीक्षा पाहत होता. तुम्हास नम्र करावे, तुमच्या अंत:करणातील गोष्टी जाणून घ्याव्या, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता की नाही ते बघावे म्हणून त्याने हे केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली चाळीस वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले ह्याचे स्मरण कर. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला रानात चाळीस वर्षात कसे चालविले, त्यांनी तुम्हाला कसे नम्र केले व तुमची परीक्षा कशी पाहिली, याची तुम्ही आठवण करा. तुमच्या अंतःकरणात काय होते, तुम्ही त्यांच्या आज्ञा पाळणार की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी असे केले. See the chapter |