२ इतिहास 34:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. यहूदातील सर्व प्रजा, यरूशलेममधील सर्व थोर तसेच सामान्य माणसे, याजक आणि लेवी हे सर्व राजासोबत होते. परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने तेथे राजाने त्यांना वाचून दाखवली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 यहूदा येथील सर्व लोक, यरुशलेमेतले सर्व रहिवासी, याजक, लेवी अशा सर्व आबालवृद्धांना बरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला; परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकांना ऐकू येतील अशी वाचून दाखवली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 यहूदीयाचे लोक, यरुशलेम येथील रहिवासी, याजक आणि लेवी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांबरोबर राजा याहवेहच्या मंदिरात गेला. याहवेहच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व शब्द त्याने त्यांना ऐकू जातील असे वाचून दाखविले. See the chapter |