२ इतिहास 30:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आपल्या पूर्वजांसारखे ताठर बनू नका. मनोभावे परमेश्वरास शरण जा मंदिराच्या पवित्र गाभाऱ्याकडे या. परमेश्वराने ते पवित्रस्थान कायमचे पवित्र केले आहे. परमेश्वर देवाची सेवा करा. तरच परमेश्वराचा तुमच्यावर भडकलेला कोप शांत होईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तुम्ही आपल्या पूर्वजांप्रमाणे ताठ मानेचे होऊ नका, तर परमेश्वराला शरण जा आणि जे पवित्रस्थान त्याने कायमचे पवित्र केले आहे, त्याच्याजवळ या व तुमचा देव परमेश्वर ह्याची उपासना करून त्याच्या भडकलेल्या कोपाचे निवारण करा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुम्ही तुमच्या पूर्वजांसारखे ताठ मानेचे होऊ नका. याहवेहना शरण जा. त्यांनी सनातनकाळासाठी पवित्र केलेल्या त्यांच्या पवित्रस्थानात या. तुमचे परमेश्वर याहवेहची सेवा करा, म्हणजे त्यांचा भयंकर क्रोध तुमच्यापासून दूर होईल. See the chapter |