२ इतिहास 19:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुम्ही सर्वांनी परमेश्वराचे भय बाळगावे. तुम्ही जे काही कराल ते सांभाळून काळजीपूर्वक करा कारण आपला परमेश्वर देव न्यायी आहे. लोकांच्या बाबतीत तो पक्षपाती नाही. आणि लाच घेऊन न्याय फिरवणे हे ही त्याच्या नीतीत बसत नाही.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर परमेश्वराची भीती तुमच्या ठायी असू द्या; तुम्ही जे कराल ते सांभाळून करा, कारण आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे काही अधर्म नाही; तो कोणाचे तोंड पाहून न्याय करीत नाही की लाच घेत नाही.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आता याहवेहचे भय तुम्हावर असू द्या, काळजीपूर्वक न्याय करा, कारण आमचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे अन्याय किंवा पक्षपात किंवा लाचलुचपत असे काही चालत नाही.” See the chapter |