मलाखी 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जेव्हा तुम्ही वेदीवर आंधळे पशू अर्पण करता, हे चुकीचे नाही काय? जेव्हा तुम्ही वेदीवर लंगडे वा रोगट पशू अर्पण करता, हे चुकीचे नाही काय? हे अर्पण तुम्ही आपल्या राज्यपालांना करून पाहा! ते तुमच्यावर प्रसन्न होतील का? ते तुमचा स्वीकार करतील का?” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तुम्ही आंधळा पशू अर्पण करता, हा अधर्म नव्हे काय? लंगडा किंवा रोगी असा बली देता, हा अधर्म नव्हे काय? असले अर्पण आपल्या प्रांताधिकार्यास देऊन तर पाहा; तो तुझ्यावर प्रसन्न होईल काय? अथवा तुझ्यावर त्याची मर्जी बसेल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ‘जेव्हा तुम्ही यज्ञ करण्यासाठी अंधळा पशू अर्पण करता, तेव्हा हे वाईट नाही काय? आणि जेव्हा तुम्ही लंगडा किंवा रोगीष्ट पशू अर्पण करता तेव्हा ते वाईट नाही काय? तू आपल्या अधिकाऱ्यासमोर हे सादर कर, तो हे स्वीकार करील का? अथवा तो तुझ्यावर अनुग्रह करेल का?’” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. Se kapitlet |